MHADA Lottery: पुणेकरांचं हक्काचं घर होणार! म्हाडाकडून 5 हजारांहून अधिक घरांसाठी सोडत

96

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार घरांची लॉटरी आज, गुरूवारी निघणार आहे. पुणे मंडळ म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला आहे. विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी माजी अध्यक्ष पटोलेंना सभागृहाचा नियम समजावत केले गप्प)

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार २११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २ हजार ८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २ हजार ८८ सदनिका अशा एकूण ५ हजार २११ सदनिकांच्या सोडतीचा शुभारंभ झाला आहे. म्हाडाने यापूर्वी काढलेल्या सोडतीला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पुणे गृहनिर्माण आणि माहिती क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

म्हाडा लॉटरीला भरभरून प्रतिसाद

दरम्यान, सदनिकांच्या विक्रीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. ९ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरूवात झाली होती. ९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार होती. या लॉटरीसाठी ८० हजारांहून अधिक अर्ज आले होते या लॉटरीला भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.