पोलीस दलात अदला-बदलीचा खेळ सुरूच! ४० सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

113

मुंबई पोलीस दलातील दहा सहाय्यक पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरुन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळालेल्या तीस अशा चाळीस सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मंगळवारी अंतर्गत बदली करण्यात आल्याचे या आदेशात सांगितले आहे. तर हा संबंधित आदेश सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

४० सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब लक्ष्मण देशमुख यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. पुणे शहराचे गोविंद गंभीर यांची मुख्य नियंत्रण कक्ष, शैलेंद्र धिवार यांची लोहमार्ग मुंबईतून मुख्यालय तीन, भारतकुमार सूर्यवंशी यांची नाशिक येथून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रकांत जाधव यांची ठाणे शहरातून गुन्हे शाखा, वंदना माने यांची ठाणे शहरातून पूर्व नियंत्रण कक्ष, राजेशसिंह चंदेल यांची नाशिक ग्रामीण येथून दक्षिण नियंत्रण कक्ष, काशिनाथ चव्हाण यांची नवी मुंबईतून गुन्हे शाखा, सुनिल बोंडे यांची ओशिवरा विभागातून उत्तर नियंत्रण कक्ष, परशुराम कांबळे यांची रायगड येथून पूर्व नियंत्रण कक्ष येथे बदली झाली आहे.

नुकतेच मुंबईतील ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सहाय्यक बढती मिळाली होती. या सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या मंगळवारी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये दत्तात्रय शिंदे यांची विशेष शाखा एकमधून विशेष शाखा एक, श्रीनिवास पन्हाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून विशेष शाखा एक, सूर्यकांत बांगर यांची मलबार हिल पोलीस ठाण्यातून ओशिवरा विभाग, अलका मांडवे यांची विलेपार्ले पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, नितीन बोबडे यांची माटुंगा पोलीस ठाण्यातून येलोगेट विभाग, रवी सरदेसाई यांची एमएचबी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, धरनेंद्र कांबळे यांची दिडोंशी पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, सावळाराम आगवणे यांची देवनार पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, श्रीराम कोरेगावकर यांची आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून संरक्षण आणि सुरक्षा विभाग, दिवाकर शेळके यांची पार्कसाईट पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, शशिकांत माने यांची जुहू पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा, जयदेव कालापाड यांची विशेष शाखा दोनमधून चेंबूर विभाग, मृत्यूंजय हिरेमठ यांची दादर पोलीस ठाण्यातून जलद प्रतिसाद पथकमध्ये बदली झाली आहे.

(हेही वाचा –तुम्हाला कोरोना झालाय? उपचारात ‘या’ औषधाचा चुकूनही करू नका समावेश)

तसेच, मनिष रावखंडे यांची सागर पोलीस ठाण्यातून मध्य नियंत्रण कक्ष, कुसूम वाघमारे यांची कुलाबा पोलीस ठाण्यातून संरक्षण आणि सुरक्षा विभाग, संजय जगताप यांची ताडदेव पोलीस ठाण्यातून मंत्रालय सुरक्षा विभाग, हरिष गोस्वामी यांची गोरेगाव पोलीस ठाण्यातून पश्‍चिम नियंत्रण कक्ष, दिपक निकम यांची एल. टी मार्ग पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, धर्मपाल बनसोडे यांची मंत्रालय सुरक्षा विभागातून विक्रोळी विभाग, किशोर गायके यांची शिवाजी पोलीस ठाण्यातून पोलीस कल्याण विभाग, सुहास हेमाडे यांची येलोगेट पोलीस ठाण्यातून जलद प्रतिसाद पथक, जयंत परदेशी यांची सशस्त्र विभागातून सशस्त्र पोलीस दल, सुधीर कालेकर यांची बोरिवली पोलीस ठाण्यातून विशेष शाखा एक, दिनकर शिलवटे यांची सहार पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, शरद ओहळ यांची कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग, साहेबराव सोनावणे यांची वाहतूक विभागातून वाहतूक विभाग, विठ्ठल शिंदे यांची विशेष शाखा एकमधून आग्रीपाडा विभाग, नामदेव शिंदे यांची कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा, बाबासाहेब साळुंखे यांची कांदिवली पोलीस ठाण्यातून मुख्यालय एक आणि शक्तीप्रसाद थोरात यांची मध्य नियंत्रण कक्षातून मध्य नियंत्रण कक्षात बदली दाखविण्यात आली आहे.

Police 2

Police 1

Police 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.