म्यानमारहून ३०० उग्रवाद्यांची भारतात घुसखोरी

168
म्यानमारहून ३०० उग्रवाद्यांची भारतात घुसखोरी
म्यानमारहून ३०० उग्रवाद्यांची भारतात घुसखोरी

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच म्यानमारमधून ३०० सशस्त्र उग्रवादी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात घुसल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, तोरबुंगच्या जंगलात तळ बनवल्यानंतर उग्रवाद्यांचा हा गट चुराचंदपूरच्या दिशेने जात आहे. यामध्ये चीन आणि कुकीचा समावेश असल्याची माहिती आहे.

या उग्रवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा ड्रोनचा वापर करत आहेत. दरम्यान, कुकी हल्लेखोरांनी दुपारी बिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी येथे पोलिसांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे एक पोलीस कमांडो शहीद झाला, तर अन्य २ पोलीस गंभीर जखमी झाले. दरम्यान, राज्यातील मोबाईल इंटरनेट बंदी २० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Manipur Violence: मणिपूरच्या इन्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार; केंद्रीय मंत्र्याचे जाळले घर)

काही दिवसांपूर्वी मेईतेई समाजाच्या लोकं गस्तीवर होते. त्यांच्याकडे मोटार आणि अत्याधुनिक शस्त्रे होती. काही लोक लाठ्या घेऊन आले होते. खोमेनलोक गावातील एका चर्चमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबताच कुकीनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. तीन बाजूंनी हल्ले करून मेईतेईच्या स्वयंसेवकांना घेरण्यात आले. एकूण १५ जणांचा मृत्यू झाला होता. न्यू चाकॉनमध्ये, मेईतेई-बहुल मिश्र लोकसंख्या, जमावाने काही घरे जाळली. घरे पेटलेली पाहण्यासाठी गर्दी जमली. त्यानंतर अग्निशमन दल माईके येथे पोहोचताच आग विझवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी विरोध सुरू केला. अग्निशमन दलाला बराच वेळ उभे राहावे लागले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.