पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, रुबी हॉल क्लिनिकच्या १५ जणांवर गुन्हा

109

पुणे पोलीसांनी किडनी तस्करी प्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मूत्रपींड प्रत्यारोपण प्रकरणी पुण्यातील प्रिसिद्ध असलेल्या रुबी हॉल क्लिनीक ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकरणी यांच्यास इतरही 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता दिशाभूल करत किडणी बदलल्याचा आरोप डॉक्टर आणि प्रशासनांवर आहे. तब्बल 15 लाख रुपयांमध्ये कोल्हापुरच्या एका महिलेची किडणी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्च महिन्यात पुढे आला होता. या प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपणाचा परवानाही निलंबीत केला होता.

प्रथम माहिती अहवालात नाव असलेल्या 15 जणांमध्ये रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रँट, उप वैद्यकीय संचालक डॉ. रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अभय सादरे, यूरोलॉजिस्ट डॉ. हिमेश गांधी, आणि प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी. किडनी मिळालेल्या पिंपरी चिंचवडमधील मोशी भागातील रुग्ण, त्याची पत्नी, दात्यासाठी पत्नी म्हणून सादर झालेली कोल्हापुरातील महिला आणि या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या काही जणांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमधील तक्रारदार हे पुणे येथील वैद्यकीय सेवा उपसंचालक आहेत. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आलो आहे. मात्र, आमिष दाखवून किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले 15 लाख रुपये पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.

(हेही वाचा – राजसाहेबांच्या सभेला अटी, शर्ती मग सेना पक्षप्रमुखांच्या ‘टोमणे सभे’ला ‘त्या’ आहेत का?, ‘मनसे’चा सवाल)

पुण्यातील सक्षम न्यायालयाच्या आदेशानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी बुधवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय दंड संहिता च्या फसवणूक, खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट या कलमांसह मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदींचा वापर केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, “घटना उघडकीस आल्यानंतर आम्ही हे प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठवले होते. त्यांची चौकशी करून आरोग्य विभागाने सक्षम न्यायालयात अहवाल सादर केला. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बुधवारी रात्री कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.” किडनी प्रत्यारोपणाला पुण्याच्या ससून जनरल हॉस्पिटलच्या प्रादेशिक प्राधिकरण समितीने परवानगी दिली होती आणि ही परवानगी त्यांना सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राप्तकर्ता आणि दात्याचे नाते सिद्ध करते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.