पावसाळ्यापूर्वी १२८ रस्त्यांची कामे पूर्ण, शहरातच ८८ नवीन रस्ते बनले

120

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांपैंकी पावसाळ्यापूर्वी एकूण १२८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहर भागातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण होत आहे. मात्र, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यात पश्चिम उपनगर खुपच मागे आहे. एकूण हाती घेतलेल्या ७८८ कामांपैंकी २८८रस्त्यांची कामांना सुरुवातच करण्यात आली नसून जी कामे सुरु आहेत,त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून अर्धवट कामेही सुस्थितीत आणून रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले आहे.

१६७ रस्त्यांच्या कामांपैकी १५५ रस्त्यांची कामे सुस्थितीत

मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी सिमेंट काँक्रिटीकरण, अस्फाल्ट आणि अल्ट्रा व्हाईट टॉपिंगची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांतंर्गत एकूण शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ७८८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. यापैंकी ४३५ कामे प्रगतीपथावर असून यातील ४२३ रस्त्यांची अर्धवट कामे पावसाळ्यात करणे शक्य नसल्याने जेवढे काम पूर्ण झाले तेवढे सुस्थितीत आणून वाहतूकीसाठी खुले करून देण्यात आले आहे. त्यामध्ये शहर भागात सुरु असलेल्या १६७ रस्त्यांच्या कामांपैकी १५५ रस्त्यांची कामे सुस्थितीत आणून ठेवण्यात आली असून उर्वरीत १२ कामेही सुस्थितीत आणली जात आहे. तर पूर्व उपगरातील प्रगती प्रथावर असलेल्या ११९ आणि पश्चिम उपनगरातील १४९ कामेही सुस्थितीत आणून ठेवण्यात आली आहे.

(हेही वाचा – MHADA Lottery: पुण्यात 5 हजार घरांची लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत भरा अर्ज)

तर संपूर्ण मुंबईतील १२८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून वाहतुकीसाठी खुली करून देण्यात आली आहे. यामध्ये शहर भागातील सर्वाधिक ८३ रस्त्यांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरांतील २८ आणि पश्चिम उपनगरांतील १७ रस्त्यांचा समावेश आहे. तर मुंबईतील एकूण २१८ रस्त्यांची कामांना अद्याप सुरुवात झालेली नसून त्यामध्ये शहर भागातील ११० रस्त्यांचा समावेश आहे, तर प पूर्व उपनगरांतील ५१ आणि पश्चिम उपनगरांतील ५७ रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती रस्ते विभागाकडून दिली जात आहे.

१२८ रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात महापालिकेला यश

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या एकूण ७८८ रस्त्यांच्या कामांपैंकी १२८ रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात महापालिकेला यश आल्याचे पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उपायुक्त संजय महाले यांनी सांगितले. याव्यतिरिक्त ४३५ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून पावसाळ्यामुळे अर्धवट थांबवून वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशाप्रकारे सुस्थितीत आणून ठेवली आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर उर्वरीत कामे हाती घेतली जातील,असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.