Zomato 1.6 Crore Offer : झोमॅटो कंपनीने एका तरुणाला दिली १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर

झोमॅटो कंपनीने एका कॅम्पस मुलाखती दरम्यान एका तरुणाला वार्षिक १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर दिली आणि गंमत म्हणजे नंतर ही ऑफर मागेही घेतली. नेमकं काय झालं पाहूया…

126
Zomato 1.6 Crore Offer : झोमॅटो कंपनीने एका तरुणाला दिली १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर
Zomato 1.6 Crore Offer : झोमॅटो कंपनीने एका तरुणाला दिली १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर
  • ऋजुता लुकतुके

झोमॅटो कंपनीने (Zomato company) एका कॅम्पस मुलाखती दरम्यान एका तरुणाला वार्षिक १.६ कोटी रुपये पगाराची ऑफर दिली आणि गंमत म्हणजे नंतर ही ऑफर मागेही घेतली. नेमकं काय झालं पाहूया… (Zomato 1.6 Crore Offer)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Indian Institute of Technology) अर्थात, आयआयटी (IIT) या देशातील अव्वल अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतींची तयारी सुरू आहे. दिल्लीच्या आयआयटी संस्थेत एका विद्यार्थ्याला एक विचित्र अनुभव आला. झोमॅटो या फूड डिलिव्हरी वेबसाईटने ह्रतिक तलवार नावाच्या एका विद्यार्थ्याला वार्षिक १.६ कोटी रुपयांची ऑफर दिली. अल्गोरिदम अभियंता म्हणून काम पाहणारी व्यक्ती कंपनीला हवी होती आणि गंमत म्हणजे काही तासातच त्यांनी ही ऑफर मागे घेतली. ह्रितिकने आपल्या ट्विटर खात्यावर झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे. (Zomato 1.6 Crore Offer)

कंपनीतील काही अंतर्गत अडचणींमुळे काही पदांसाठीची भरती सध्या होऊ शकत नाही, असं कंपनीने कळवल्याचं ह्रतिकच्या पोस्टवरून दिसतंय. हे ट्विट एका दिवसातच चांगलं व्हायरल झालंय. १ लाख ६२ हजार लोकांनी ते २४ तासांच्या आत पाहिलंय आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Zomato 1.6 Crore Offer)

(हेही वाचा – Mark Zuckerberg : सकाळी ८ वाजता उठतात मार्क झुकरबर्ग, कशी असते फेसबुक संस्थापकांची दिनचर्या?)

दीड कोटींच्या वर पगाराची ऑफर झोमॅटोनं खरंच दिली होती का, असा प्रश्न काहींना पडला. तर काहींना कंपनीकडून केलेलं एक ‘मार्केटिंग गिमिक’ वाटत आहे. म्हणजे कंपनी लोकांसमोर आपण इतकी मोठी कंपनी असल्याचा आव आणत असल्याचा आरोप या लोकांनी केलाय. (Zomato 1.6 Crore Offer)

एकाने प्रतिक्रिया देताना, ‘कंपनीला १६ लाख पगार द्यायचा असेल. त्यांनी चुकून १.६ कोटी असं लिहिलं,’ असा मजेशीर शेरा मारला आहे. (Zomato 1.6 Crore Offer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.