Zero Prescription Policy : महापालिकेच्‍या रुग्‍णांना बाहेरची औषधे बंद

गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी "झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी" राबविण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.

140
Zero Prescription Policy : महापालिकेच्‍या रुग्‍णांना बाहेरची औषधे बंद
Zero Prescription Policy : महापालिकेच्‍या रुग्‍णांना बाहेरची औषधे बंद

मुंबई महापालिकेच्‍या (BMC) रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ (Zero Prescription Policy) राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख व निःशुल्क उपलब्ध होतील.

(हेही वाचा – Viksit Bharat Sankalp Yatra : गरजूंना वस्तूंचे वाटप; विकसित भारत संकल्प यात्रेला रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा)

औषधेखरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश

ही योजना राबविण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्‍यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी के.ई.एम (KEM) रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्‍या चर्चे दरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनां व्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो.

(हेही वाचा – MHADA : विरार-बोळींज म्हाडा प्रकल्पाला सूर्या प्रकल्पातून पाणीपुरवठा)

झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी

गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडीचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्‍के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात. राष्‍ट्रीय स्‍तरावर विविध संस्‍थांनी केलेला अभ्‍यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. (Zero Prescription Policy)

(हेही वाचा – Urban Naxal : राजकीय पक्षांमध्ये अर्बन नक्षलवाद्यांची घुसखोरी ?)

मुंबई महानगरपालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्‍णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात. (Zero Prescription Policy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.