Yavatmal Nagpur Highway Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

141
Yavatmal Nagpur Highway Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
Yavatmal Nagpur Highway Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी (1 जुलै) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये (Yavatmal Nagpur Highway Accident) पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Yavatmal Nagpur Highway Accident)

(हेही वाचा –lonavala bhushi dam प्रकरणातील दोघांचा शोध अजूनही सुरुच)

पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. थांबलेल्या ट्रकला त्यांची इनोव्हा गाडी मागून धडकली. या अपघातात इनोव्हा गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Yavatmal Nagpur Highway Accident)

गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला अन् पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. (Yavatmal Nagpur Highway Accident)

(हेही वाचा –LPG Price Reduced: सर्वसामान्यांना दिलासा! सिलेंडरच्या किंमतीत कपात, किती रुपयांना मिळणार?)

या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. (Yavatmal Nagpur Highway Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.