Central Railway : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित; टॉकबॅक यंत्रणेनंतर आता पॅनिक बटन

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे डब्यातील सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेनंतर आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन बसविण्यात येणार आहे.

162
Central Railway : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित; टॉकबॅक यंत्रणेनंतर आता पॅनिक बटन
Central Railway : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित; टॉकबॅक यंत्रणेनंतर आता पॅनिक बटन

अडचणीत असलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांतील फलाटांवर पॅनिक बटन (Panic Button) बसविण्यात येणार आहे. मुंबई विभागात सर्वप्रथम भायखळा स्थानकामध्ये हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे.रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व टॉकबॅक यंत्रणा बसविल्यानंतर आता फलाटावर पॅनिक बटन कार्यान्वित करण्यात येणार आहे. (Central Railway)

महिलांसाह सर्वच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सध्या नावीन्यपूर्ण उपायांची चाचपणी करण्यात येत आहे.  ११७ रेल्वे स्थानकांतील प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटन बसविण्यात येत आहे. असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितले. यापैकी ७० रेल्वे स्थानके मुंबईतील आहेत.(Central Railway )

अशी काम करणार यंत्रणा

भायखळा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वर महिला डबा येणाऱ्या ठिकाणी ही बटन कार्यान्वित करण्यात आले आहे. फलाटच्या सीएसएमटीकडील बाजू आणि ठाण्याकडील बाजूला प्रत्येकी एक बटन आहे. बटन दाबताच तेथील सीसीटीव्ही कॅमेरा संबंधित व्यक्तीला हेरून त्याची हालचाल टिपतो. तसेच याची माहिती स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासह रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळते असे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यानी स्पष्ट केले.

(हेही वाचा : Ind vs SA 3rd ODI : भारताच्या दुसऱ्या फळीचा दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम )

३१ मार्च पर्यंत सर्व डब्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित 
लोकल मधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. सध्या ७७१ महिला डब्यांपैकी ५१२ डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा सुरू झाली आहे.४२१ डब्यांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. ३१ मार्च पर्यंत सर्व डब्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. असेही यादव यांनी सांगितले.

कुठे बसविणार यंत्रणा 

  • फलाटाच्या दोन्ही दिशांना पॅनिक बटन
  • महिला डब्यासमोर सहज दिसणाऱ्या ठिकाणी बसवणार
  • बटन दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटणार.
  • फलाटावरील सीसीटीव्ही संबंधित प्रवाशाला टिपणार.

आरपीएफ आणि नियंत्रण कक्षापर्यंत माहिती पोहोचणार .

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.