Raj Thackeray : अजित पवार यांच्या बद्दल राज ठाकरे असे काही म्हणाले, की…

Raj Thackeray : एकमेकांच्या विरोधात असणारे नेत्यांचे मनोमिलन होत असून चक्क राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे.

193
Raj Thackeray : अजित पवार यांच्या बद्दल  राज ठाकरे असे काही म्हणाले, की...
Raj Thackeray : अजित पवार यांच्या बद्दल  राज ठाकरे असे काही म्हणाले, की...
राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाद सर्वश्रृत आहेत. राज ठाकरे आणि अजित पवार यांनी कायमच एकमेकांवर टीका केली आहे. मात्र, एकमेकांच्या विरोधात असणारे नेत्यांचे मनोमिलन होत असून चक्क राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले,अजित पवार (Ajit Pawar) या माणसाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.  आज पर्यंत त्यांनी जातीपातीचे राजकारण केले असे मला आठवत नाही. (Raj Thackeray)
पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha Constituency) भाजपाचे (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा झाली, या जाहीर सभेत बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जातीपातीचे विष कालवण्याचे काम १९९०पासून झाल्याचे सांगितले. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांनी  राष्ट्रवादीची स्थापना १९९०साली केली. पण अजित पवार या माणसाने जातीपातीचे राजकारण केले नाही. आजवपर्यँत केले नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत साहेबत राहूनही त्यांनी कधी जातीपातीचे राजकरण केल्याचे मला आठवत नाही,असे सांगितले. (Raj Thackeray)
हे जातीपातीचे विष हे १९९०सालापासून कालवले जात आहे. या पुण्यातील चौकात राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. त्यावरून वाद निर्माण केला. त्यानंतर जेम्स लेन प्रकरण आहे. या जेम्स लेन प्रकरणावर जातीय विष कालवण्याचा प्रयत्न झाला. तो पुढे येवून सांगतोय मी कुणाशी बोललो नाही, पण तोपर्यंत या प्रकरणावर विष कालवून मोकळे झाले होते. तुम्ही या जातीपातीच्या नावावर मतदान करावे म्हणून असे प्रयत्न केले जातात. (Raj Thackeray)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.