Women in Media : मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात उच्चपदांवरील महिलांचं प्रमाण फक्त १३ टक्के

मनोरंजन आणि मीडियातील लिंग असमानता पुन्हा एकदा समोर आली आहे. उच्चपदांवर महिलांची नेमणूक होत नाही, असंच चित्र ताज्या अहवालातून समोर आलं आहे

90
Women in Media : मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात उच्चपदांवरील महिलांचं प्रमाण फक्त १३ टक्के
Women in Media : मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात उच्चपदांवरील महिलांचं प्रमाण फक्त १३ टक्के
  • ऋजुता लुकतुके

मनोरंजन आणि मीडियातील लिंग असमानता पुन्हा एकदा समोर आली आहे. उच्चपदांवर महिलांची नेमणूक होत नाही, असंच चित्र ताज्या अहवालातून समोर आलं आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला काम करत असतानाही त्यांची उच्चपदावर नेमणूक होण्याचं प्रमाण फक्त १३ टक्के असल्याचं ताज्या अहवालातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे २०२२ मध्ये हे प्रमाण १० टक्के होतं. ते आता थोडं वर आलं आहे. (Women in Media)

ओह विमेनिया या ताज्या अहवालातून आणखीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीडिया व मनोरंजन क्षेत्रातील कॉन्टेन्ट, महिलांचं मीडिया ग्रुपच्या जाहिरातींमधील स्थान आणि कॉर्पोरेट पातळीवर त्यांना मिळणाऱ्या संधी या निकषांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. (Women in Media)

(हेही वाचा – Service to Parents : आई-वडिलांची सेवा हे कायदेशीर कर्तव्य; अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले श्रावणकुमारचे उदाहरण)

यातील कॉन्टेन्ट या निकषात लेखन, दिग्दर्शन तसंच निर्मितीशी जोडलेलं कुठलंही काम, अगदी अँकरिंगही धरण्यात आलं आहे. तर जाहिरातींचा निकष पडताळून पाहण्यासाठी कंपनी एखाद्या कार्यक्रमाचा प्रोमो करते किंवा बॅनर लावले जातात, यात महिलांचं प्रतिनिधित्व किती असतं हे पाहण्यात आलं. आणि शेवटच्या कॉर्पोरेट निकषात निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग नेमका किती असतो, बोर्ड बैठकांना त्या हजर राहतात का हे पाहिलं गेलं. (Women in Media)

या तीन निकषांवर देशातील अव्वल २५ मनोरंजन आणि मीडिया कंपनीतील १३५ पदांचा अभ्यास करण्यात आला. संचालक किंवा विभागप्रमुख तसंच कार्यकारी प्रमुख ही पदं सर्वेक्षणात गृहित धरण्यात आली होती. यात उच्चपदस्थ व्यक्तींपैकी फक्त १३ टक्के महिला असल्याचं लक्षात आलं. तर निर्मिती, दिग्दर्शन, संकलन अशा कुशल कामांमध्ये स्त्रियांना विभागप्रमुख बनवण्याचं प्रमाणही १२ टक्केच होतं. २५ मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच देशातील ८ प्रादेशिक भाषांमधून प्रसिद्ध झालेले १५६ चित्रपट आणि वेबसीरिज यांचा अभ्यास या अहवालात करण्यात आला. (Women in Media)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.