Delhi High Court on Muslim Mahapanchayat : रामलीला मैदानावर मुसलमान महापंचायतीला अनुमती नाही; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ कारण

रामलीला मैदानावर मुस्लिम महापंचायत होणार नाही. मुस्लिम महापंचायतीचे पोस्टर पाहून असे दिसते की, हा कार्यक्रम सांप्रदायिक असू शकतो आणि त्यामुळे जुन्या दिल्लीत तणाव निर्माण होऊ शकतो, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

31
Delhi High Court on Muslim Mahapanchayat : रामलीला मैदानावर मुसलमान महापंचायतीला अनुमती नाही; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले 'हे' कारण
Delhi High Court on Muslim Mahapanchayat : रामलीला मैदानावर मुसलमान महापंचायतीला अनुमती नाही; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले 'हे' कारण

दिल्ली उच्च न्यायालयाने रामलीला मैदान महापंचायतीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. (Delhi High Court on Muslim Mahapanchayat) 29 ऑक्टोबर रोजी रामलीला मैदानावर मुस्लिम महापंचायत होणार होती. यावेळी 10 हजारांहून अधिक लोक उपस्थित रहाणार, असे नियोजन होते.  ‘वी द इंडियन मुस्लिम’ (आम्ही भारतीय मुसलमान) या नावाने या महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार होते. यात सध्या मुसलमनांसमोर उपस्थित होणार्‍या सूत्रांविषयी चर्चा होणार होती. याविषयी ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’च्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय असेल आणि यात सर्व धर्मांमध्ये शांतता अन् सहकार्य यांसाठी इच्छा व्यक्त केली जाईल. (Delhi High Court on Muslim Mahapanchayat)

(हेही वाचा – Hike In Onion Price : डिसेंबर पर्यंत कांद्याचे दर राहणार चढेच)

उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत म्हटले की, मुस्लिम महापंचायतीचे पोस्टर पाहून असे दिसते की, हा कार्यक्रम सांप्रदायिक असू शकतो आणि त्यामुळे जुन्या दिल्लीत तणाव निर्माण होऊ शकतो. तथापि उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ‘सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर याचिकाकर्ते वक्त्यांची यादी देऊन आणि जातीय तणाव होणार नाही’ असे आश्वासन देऊन नवीन याचिका दाखल करू शकतात. (Delhi High Court on Muslim Mahapanchayat)

‘मिशन सेव्ह कॉन्स्टिट्यूशन’ नावाच्या संस्थेने ही याचिका दाखल केली होती. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ’29 ऑक्टोबर रोजी रामलीला मैदानावर मुस्लिम महापंचायत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली होती’, असे याचिकेत म्हटले होते. मात्र नंतर हा कार्यक्रम ‘सांप्रदायिक स्वरूपाचा’ असल्याचे सांगून मध्य दिल्लीच्या डी.सी.पी. यांनी ही परवानगी रद्द केली. अल्पसंख्यांक समुदायांना एससी-एसटी आणि ओबीसी समुदाय बळकट करण्यासाठी संस्थेला अनेक कार्यक्रम सुरू करायचे आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. तो 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता.  (Delhi High Court on Muslim Mahapanchayat)

काय म्हणाले उच्च न्यायालय ?

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. करवा चौथ आणि धनत्रयोदशीसारखे सणही आहेत. लोकांना त्यांच्या हक्कांविषयी शिक्षित करण्यासाठी महापंचायत आयोजित केली जात असली, तरी दिल्ली पोलिसांनी प्रदर्शित केलेल्या पोस्टरवरून असे सूचित होते की, ती सांप्रदायिक असू शकते, ज्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले. हा एक संवेदनशील भाग आहे कारण येथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहतात. येथील एस.एच.ओ.ला प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे. त्या भीतीला काल्पनिक म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. (Delhi High Court on Muslim Mahapanchayat)

पोलिसांनी काय दिले कारण ?

पोलिसांनी यापूर्वी महापंचायत आयोजित करण्याची परवानगी दिली होती; परंतु नंतर ती मागे घेण्यात आली. प्रस्तावित कार्यक्रम सांप्रदायिक वाटत असल्याच्या लोकांच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही परवानगी मागे घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.16 ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्तांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले होते की, कार्यक्रमाशी संबंधित जी पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत, त्याचा अजेंडा सांप्रदायिक असल्याचे दिसते. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे जातीय द्वेष पसरू शकतो.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अरब देशांमध्ये तणाव असल्याचेही त्यात म्हटले आहे. अशा परिस्थितीत असे कार्यक्रम कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्याने जुन्या दिल्लीचे वातावरण खराब होऊ शकते. (Delhi High Court on Muslim Mahapanchayat)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.