राज्यात नाईट कर्फ्यू लागणार?

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

82

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका देशावर असताना केंद्र सरकारने देखील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यातच आता राज्य सरकार देखील अलर्ट झाले असून, सणासुदीच्या तोंडावर राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची चिन्हे आहेत.

राजेश टोपेंनी दिले संकेत

केरळमधील रुग्ण वाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ नोंदवणाऱ्या महाराष्ट्रातील जास्त संसर्ग दर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली होती. त्याबाबत आता राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्यात कोरोना वाढणार… दादांचे भाकीत)

शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम

शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखेपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्याबाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरू आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत.

आपल्याला सावध होण्याची गरज

केरळमध्ये ओनम उत्सवात 30 ते 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आपल्याला सावध होणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. याबाबत केंद्राने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य करेल आणि त्याबाबत मुख्यमंत्री सूचना देतील, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचाः दहीहंडी, गणेशोत्सव सुपर स्प्रेडर बनतील! असे का म्हणाले केंद्र सरकार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.