Pankaja Munde : त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधणार; पंकजा मुंडेंनी दिला सूचक इशारा ?

आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होऊ देणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंकजा मुंडे बोलत होत्या

59
Pankaja Munde : त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधणार; पंकजा मुंडेंनी दिला सूचक इशारा ?
Pankaja Munde : त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधणार; पंकजा मुंडेंनी दिला सूचक इशारा ?

चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर निवडून येणाऱ्यांना आता पाडणार आहे. (Pankaja Munde) जिंकून येण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही. 2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला, तर मला कुबड्या घेऊन चालावे लागेल. माझ्यामुळे या स्टेजवर बसलेल्यांना त्रास कमी होतो; पण माझ्या जनतेला जास्त त्रास होतो. दरवेळी तुमचा अपेक्षाभंग होतो. त्यासाठी मी तुमची माफी मागते. कुणी म्हणते ताई या पक्षात चालल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही. आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होऊ देणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. (Pankaja Munde)

(हेही वाचा – Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलची मैत्रिण अॅड. प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड)

या वेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, ”राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत. पाच वर्षे मी पक्षासाठी मरमर निष्ठेने काम केले. भगवान बाबांनासुद्धा दुसरा गड बनवावा लागला, भगवान श्रीकृष्णाला मथुरा सोडावी लागली, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ग्रामविकास मंत्री होते, तेव्हा प्रत्येक गावात विकासकामे केली. जेवढे प्रेम मी परळीवर केले, तेवढेच पाथर्डीवरही केले. मोनिकाताईंचा मतदारसंघ हा मला माझाच मतदारसंघ वाटतो, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे वाढलेले प्रस्थ आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत केलेली सत्तासोबत बघता पंकजा मुंडे पाथर्डीमधून आगामी निवडणूक लढणार का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pankaja Munde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.