भारतीयांसमोर कोरोना का हरतोय? 

105

मुंबई – अवघ्या जगाला गुडघे टेकायला लावणाऱ्या कोरोनाने मात्र भारतीयांसमोर अक्षरशः हात टेकले आहे. आता तर तो ज्या संख्येने दररोज भारतीयांना बाधित करत आहे, तितक्याच संख्येने किंबहुना जास्त संख्येने कोरोनाबाधित भारतीय रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. यामागील कारण म्हणजे भारतीयांच्या डीएनएमध्ये अमेरिका आणि युरोपिनयन लोकांच्या तुलनेत एक असा जिन अधिक प्रमाणात आहे. ज्यामुळे कोरोनाशी लढण्याची भारतीयांची क्षमता अधिक आहे. या जिनमुळेच भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला आहे.

काय आहे एसीई जीन?

भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एसीई जीन आहे. काशी हिंदू विद्यापीठामधील जीवशास्त्राचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबै यांनी  सांगितले की, कोरोनामुळे माणसाची सुरक्षा प्रणाली चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे, त्यामागचं नेमकं कारण काय, तसेच काही लोकांवर या विषाणूचा म्हणावा तसा परिणाम होत नाही याचं कारण जाणून घेण्यासाठी जगभरातील  मानवी जीनोमचा अभ्यास करण्यात आला. प्राध्यापक चौबै यांनी सांगितले की या संशोधनामध्ये आफ्रिका, युरोप, दक्षिण आशिया, दक्षिण मध्या आशिया आणि सैबेरिया येथील लोकांचा समावेश करण्यात आला. आम्ही जगभरातील ५८३ लोकांचा अभ्यास केला त्यानंतर यासंदर्भाच पाच पेपर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळा इटली आणि युरोपीय देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र भारत आणि दक्षिण आशियातील लोकांच्या जीनोमचा स्ट्रक्सरअशा प्रकार आहे की ज्यामुळे भारतात मृत्यूदर खूप कमी आहे. कुणाच्याही शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यानंतर तो आपली प्रतिरूपे तयार करण्यास सुरुवात करतो. म्हणजेच आपल्यापासून अनेक कोरोना विषाणू तयार करतो. शरीरातील एक्स क्रोमोझोमवर एक जीनोम एसीई-२ असतो. हाच रिसेप्टर म्हणजेच यजमानाचं काम करतो. कोरोना विषाणू या जिनोमशी जुळवून घेत अनेक विषाणू तयार करतो. मात्र भारत आणि दक्षिण आशियामधील लोकांच्या शरीरात एसीई-२ जीनोम एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्युटेशन कॅरी करत आहे की ज्यामुळे कोरोनाचा शरीरातील प्रवेश करण्याचे प्रमाण घटले आहे.

महाराष्ट्रात का वाढतोय कोरोना?

या रिसर्च टीममध्ये सहभागी झालेले तज्ज्ञ प्रज्वल प्रताप सिंह यांनी सांगितले की,महाराष्ट्रामध्ये भारताच्या अन्य भागांच्या तुलनेत एसीई-२ च्या फ्रिक्वेंसीचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात  मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. तर झारखंड आणि उत्तर-पूर्वेकडील आदिवासी जमातींमध्ये या फ्रिक्वेंसीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचे प्रमाण कमी आहे. भारतीयांमध्ये हर्ड इम्युनिटीपेक्षा कोरोनाविरोधातील प्रतिकारक्षमता आधीपासूनच उपस्थित आहे. ही क्षमता लोकांच्या शरीरातीत पेशींमध्ये उपस्थित एक्स क्रोमोसोमच्या जीन एसीई-२ रिसेप्टरमधून मिळते. त्यामुळेच या जीनमध्ये चाललेले म्युटेशन कोरोना विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते.

कोरोनाच्या संक्रमणामागील रहस्य काय?

एका व्यक्तीच्या शरीरामध्ये तब्बल ३.२ अब्ज पेशीं असतात. प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतो. हा डीएनएच पेशींना कुठले काम आवश्यक आहे आणि कुठले नाही, यासंबंधीचे आदेश देत असतो. हाच डीएनए जेव्हा शरीरावर कुठल्याही विषाणूचा हल्ला होतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी आदेश देतो. डीएनएमध्ये १ पासून २२ पर्यंत क्रोमोसोम असतात. ज्यांना आपण एक्स आणि वाय क्रोमोसोम म्हणून ओळखतो. यामधील एक्स क्रोमोसोमवर एसीई-२ रिसेप्टर आढळतो. त्याच्यावरच कोरोना विषाणूकडून हल्ला होतो. कुठल्याही प्राण्याच्या डीएनएमधील सर्व जीनांच्या साखळीला जीनोम म्हणतात. हा एसीई-२ रिसेप्टरसुद्धा जीनोमचाच एक भाग आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.