Coastal Road Project ची अडवणूक कोणी केली, फडणवीस यांनी कुणाकडे दाखवले बोट

कोस्टल रोडची एक मार्गिका सोमवारी अंशत: खुली करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून सोशल मिडियावर कोस्टल रोडचे श्रेय सरकार घेत असल्याच्या पोस्टचा हवाला देत त्यांचा समाचार घेतला.

523
Coastal Road Project ची अडवणूक कोणी केली, फडणवीस यांनी कुणाकडे दाखवले बोट

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाच्या (Coastal Road Project) श्रेयाबाबत उबाठा शिवसेनेने सरकारवर टिका केली आहे. मात्र, आम्ही कुणाच्या कामाचे श्रेय घेत नाही तर आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेतो असे सांगत याचा तिखट शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. कोस्टल रोड प्रकल्प उबाठा शिवसेनेमुळे सुरु झाला असा जर त्यांचा दावा असेल तर या प्रकल्पाला अडवणूक करणारेही हेच होते असे सांगत फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कुणी त्रास दिला आणि प्रकल्प अडवण्याचा कुणी प्रयत्न केला याचा पाढाच वाचून दाखवला. त्यामुळे जर ठाकरेंच्या हाती अजून सत्ता असती तर हा प्रकल्प अजून काही वर्षे लांबणीवर पडला असता असेही त्यांनी सांगितले. (Coastal Road Project)

कोस्टल रोडची एक मार्गिका सोमवारी अंशत: खुली करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून सोशल मिडियावर कोस्टल रोडचे (Coastal Road Project) श्रेय सरकार घेत असल्याच्या पोस्टचा हवाला देत त्यांचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, जेव्हा राज्यात ठाकरे यांचे सरकार होते. तेव्हा मी विरोधी पक्ष नेता होतो. पण त्यावेळी माझ्याकडे काही कंत्राटदार येत होते. या प्रकल्पामध्ये कशी वसुली सुरू आहे, हे मला सांगत होते. तेव्हा कशी मागणी व्हायची. आमच्याच माणसांना काम द्या असे कसे सांगितले जात होते. त्यामुळे इकडचे स्थानिक आमदार कोण आहेत. कोणाचा दबाव आहे हे सांगायला नको,असे सांगत एकप्रकारे फडवणीस यांनी शिवसेना उबाठा आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्ष समाचार घेत त्यांचा पर्दाफाशच केला. (Coastal Road Project)

म्हणून ब्लॅकमेल करणारे बाजुला झाले

आपल्या राज्यात सत्ता बदल झालाय. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आले आणि दोन-चार वर्षात जे झाले नाही ते काही वर्षांतच जोरात सुरु झाले. शिंदे सरकार विराजमान झाले. त्यानंतर या प्रकल्पाने प्रकल्पाने गती धरली आणि अडवणूक करणारे आणि ब्लॅकमेल करणारे सगळे बाजूचा झाले. (Coastal Road Project)

कोळी समाजाचा न्याय हा शिंदे यांनी दिला

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला त्यांना कोळी समाजाला न्याय देता आला असता. पण शिंदे आल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने या कोळी समाजाला न्याय दिला गेलाय. त्याबद्दल महापालिका आयुक्त चहल यांचेही अभिनंदन. खरे तर आज मुख्यमंत्री खंबीर होते म्हणून हा प्रकल्प होऊ शकला आणि अडवणूक करणाऱ्यांना दुःख झाले. त्यामुळे फेसबुकमधून बोलतात त्यांनी याकडेही लक्ष द्यावे, असे फडणवीस म्हणाले. (Coastal Road Project)

(हेही वाचा – Lok Sabha Election : अमित शहा आणि महाराष्ट्रातील नेत्यांची मंगळवारी दिल्लीत बैठक)

कोत्या मनाचे कोण आणि मोठ्या मनाचे कोण?

या प्रकल्पाचे काम एमएसआरडीसी, एम. एम. आर. डी. ए आणि महापालिका या तिघांपैकी कुणाकडून ते करून घ्यावा असे ठरवले होते. पण उद्धव ठाकरे यांनी मात्र हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून करावा असा अट्टाहास धरला आणि त्यामुळे मी त्याला पाठिंबा दिला. पण जेव्हा या प्रकल्पाचे भूमीपुजन करण्यात आले तेव्हा शिवसेनेने मी मुख्यमंत्री असतानाही मला बोलावले नाही. मुख्यमंत्री असताना मला डावलले. त्यामुळे कोत्या मनाचे कोण आणि मोठ्या मनाचे कोण हे समजतेच. (Coastal Road Project)

म्हणून मी सत्य सांगितले

त्यावेळी हा प्रकल्प मी महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प न करता एमएमआरडीए किंवा एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प करून घेऊ शकलो असतो. पण मुंबईचा विकास हा महत्वाचा आहे. श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे. मुंबईचा विकास होणे आवश्यक आहे, हीच भूमिका आमची आहे. आज श्रेयवादावरून जे लोक टिका करत आहेत, त्यामुळे याचे सत्य सांगण्यासाठी मला आज बोलावे लागले. नाहीतर जे खोटे सांगितले जाते तेच लोकांच्या मनावर बिंबवले जाते. म्हणून हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. (Coastal Road Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.