Lok Sabha Election : अमित शहा आणि महाराष्ट्रातील नेत्यांची मंगळवारी दिल्लीत बैठक

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि बुलढाणा यासारख्या काही जागांवर हा पेच निर्माण झाला असल्याचे समजते.

124
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत

महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी बोलावलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता उद्या मंगळवारी होणार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करता आलेली नाही. (Lok Sabha Election)

गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जागा वाटपाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी बोलावलेली बैठक आता उद्या मंगळवारी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तिन्ही पक्षांतील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरत नाही आहे. अमित शहा आणि महाराष्ट्रातील नेते यांच्यात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. पहिली बैठक महाराष्ट्रात झाली होती आणि दुसरी दिल्लीत झाली होती. परंतु, तिढा अद्याप सुटलेला नाही. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Ram Naik : राज्यपालपदी असतांना फैजाबादचे अयोध्या केले; पद्मभूषण राम नाईक यांचा दावा)

या जागांवरही वाद निर्माण झाल्याची चर्चा 

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि बुलढाणा यासारख्या काही जागांवर हा पेच निर्माण झाला असल्याचे समजते. शिवाय उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक, धुळे, नंदूरबार, शिर्डी आणि अहमदनगर या जागेवरही वाद निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. या ठिकाणाहून भाजपाला उमेदवार उतरवायचे आहेत. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुध्दा यातील काही जागांवर दावा केला आहे. (Lok Sabha Election)

अमरावतीहून नवनीत राणा खासदार आहेत. त्या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या जाती प्रमाणपत्राचा मोठा वाद आहे. यामुळे भाजपासुध्दा त्यांना पक्षात घेण्यास मागे-पुढे पाहत आहे. या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ येथून इच्छुक आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ते माघार घेण्यास तयार नाहीत. भाजपासाठी विदर्भ हा गड आहे. २०१९ मध्ये विदर्भातील आठ जागा रालोआला मिळाल्या होत्या. यातील पाच भाजपाला आणि शिवसेनेला तीन जागांचा समावेश आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.