Interim budget : अंतरिम अर्थसंकल्पावर काय म्हणतात विरोधक?

199

केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प (Interim budget) हा विकासाचा आभास निर्माण करणारा,नोकरदार,मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प असून खरं तरं तो अंतरिम नसून अंतिम असल्याची खरमरीत टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, असा हा अंतरिम अर्थसंकल्प (Interim budget) सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.भांडवलदारांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार असून फक्त भाजपचे उद्योजक स्नेही मित्र फायद्यात आहेत. फक्तं कॉर्पोरेट टॅक्स कमी केला पण सर्वसामान्यांना मात्र करात कोणतीही सूट देण्यात आली नाही.यावरून सरकार कोणाचे भल करते हे स्पष्ट होत असल्याचा थेट आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील नेत्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मी पुन्हा येईन,अशी भाषा वापरली परंतु हा अर्थसंकल्प अंतरिम (Interim budget) नसून अंतिम आहे. कारण गेल्या ९ वर्षात मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या आहेत.

(हेही वाचा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या विकासाला चालना; काय म्हणाले उपमुख्यमंत्री Ajit Pawar?)

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे अजून पूर्ण नाहीत.सामाजिक न्याय देणारे सरकार, असा डांगोरा केंद्र सरकार पिटत असले तरी ओबीसी, एसी, एसटी विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळत नाही. एकीकडे सरकार दावा करते की, २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढले. दुसरीकडे आम्ही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देतो, हे सरकारकडून सांगितले जाते. यावरून यातील विरोधाभास स्पष्ट होत असून देशात गरिबीची संख्या वाढल्याची कबुलीच केंद्र सरकारने दिल्याचे निदर्शनास आणून देत अर्थसंकल्पात युवकांसाठी, बेरोजगार बाबत काही ठोस मांडलेले नाही.देशात धार्मिक उन्माद करून या सरकारने युवकांना देशोधडीला लावले आहे.त्यामुळे बेरोजगार युवक म्हणजे सक्षम युवक का? असा सवालही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.