western Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ३ पर्यंत चालू राहणार लोकल सेवा

विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून या ज्यादा ट्रेन सोडणायचे प्रयोजन करण्यात आले आहे. 

103
western Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ३ पर्यंत चालू राहणार लोकल सेवा
western Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ३ पर्यंत चालू राहणार लोकल सेवा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई उपनगरातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त राजधानी मुंबईत येतात. यावर्षी अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारोच्या संख्येने मुंबई उपनगरातून मुंबईमध्ये गणेश भक्त दाखल होणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे (western Railway) मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष आठ ट्रेन सोडण्यात येणार आहेत

विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून या ज्यादा ट्रेन सोडणायचे प्रयोजन करण्यात आले आहे.  गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या मार्गावर धीम्या लोकल उपलब्ध होणार आहेत.रात्री उशिरा प्रवास करताना प्रवाशांनी पोलिसांच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

(हेही वाचा : Trans harbor : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम वेगात, किती टक्के काम पूर्ण, वाचा…)

चर्चगेट ते विरार : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १.१५, १.५५, २.२५ आणि शुक्रवारी पहाटे ३.२०

विरार ते चर्चगेट : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१५, १२.४५, १.४० आणि शुक्रवारी पहाटे ३

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.