Weather Update : राज्यासह देशात पुन्हा पावसाची शक्यता

144
Weather Update : राज्यासह देशात पुन्हा पावसाची शक्यता

राज्यात गेले काही दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीमध्ये देखील पावसाने आपली हजेरी लावली आहे. अशातच राज्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)

एकीकडे राज्यातील काही भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. तर दुसरीकडे देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. (Weather Update)

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत.

(हेही वाचा – World Diabetes Day : मुंबईकर लठ्ठ; पुरुषांपेक्षा महिलाच पुढे!)

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि (Weather Update) कराईकलच्या अनेक किनारी भागात आणि तमिळनाडूच्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागाने रामनाथपुरम, पुदुक्कोट्टई, तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायलादुथुराई, तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यांतील आणि कराईकल भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, शिवगंगा, पेरांबलूर, अरियालूर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यांत आणि पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather Update)

(हेही वाचा – Air pollution: मुंबईकरांचा घुसमटलेला श्वास कधी मोकळा होणार ?)

हवामान खात्यानुसार, मंगळवारी 14 नोव्हेंबरला तामिळनाडू, पुद्दुचेरी, (Weather Update) कराईकल, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Weather Update) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.