ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद

161

मिरा-भाईंदर या विभागात स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. जांभूळ येथे अतिवृष्टीमुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली असून तरंगणारा कचरा मोठ्या प्रमाणावर इनलेट स्क्रीनवर जमा झालेला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. सर्व इनलेट स्क्रीनवरील साफ-सफाईचे काम करण्याकरता तसेच इतर दुरुस्तीची कामे करुन घेण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यत 4 तासांकरीता बंद राहणार आहे.

( हेही वाचा : मंकीपॉक्स संदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी; आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र)

चार तास पाणी पुरवठा बंद

तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशिराने होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.