मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना मंकीपॉक्सबाबत सतर्क केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
( हेही वाचा : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद)
मंकीपॉक्स संदर्भात केंद्राकडून Guidelines
परदेशातून येणाऱ्या लोकांवर सतत मांकीपॉक्स संदर्भात लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली होती. मात्र सुदैवाने भारतात अद्याप त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजन्याच्या रुग्णांसारखीच असतात. मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 6 हजारांहून अधिक झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळली आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community