कोकणी पाड्यातील पाणी पुरवठा सुधारणार

102

दहिसर कोकणी पाडा येथील कैलास नगर, सोनू भोईर, ज्ञानेश्वर नगर येथील उंचावरील परिसरास तेथीलच कैलास नगर, सोनू भोईर, ज्ञानेश्वर नगर येथील स्वतंत्र शोषण टाकी व पंपिंग स्टेशन द्वारे पाणी पुरवले जाते. परंतु विस्तारीत शोषण टाकी व पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन चाचणीही यशस्वी पार पडली आहे. त्यामुळे कोकणी पाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला जाणार आहे.

समस्येची नगरसेविकेकडून विचारणा

दहिसर बोरिवलीमध्ये पाण्याची समस्या जाणवत असल्याने शिवसेना नगरसेविका आणि आर/मध्य व आर/ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही, माझ्या कोकणीपाडा विभागामध्ये पूर्वी व्यवस्थित पाणी पुरवठा होत होते. परंतु सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नेमकी काय समस्या झाली आहे अशी विचारणा त्यांनी केली होती.

(हेही वाचा – ‘अमरावती बंद’ ला शिवसेनेचाही होता पाठिंबा?)

चाचणी काळात पाणी पुरवठा सुधारला

यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेला रासु यांनी आर /उत्तर विभागातील प्रभाग क्र.४ मधील दहिसर (पूर्व) परिसरास बोरीवली टेकडी जलाशय क्र.२ मधून पाणी पुरवठा केला जातो. प्रभाग क्र.४ मधील कोकणीपाडा येथील कैलासनगर, सोनू भोईर, संत कबीर रोड तसेच रावळपाडा येथील ज्ञानेश्वर नगर हा परिसर उंचावर वसलेला आहे. हा परिसर प्रामुख्याने झोपडपट्टीचा असल्याने त्या वस्त्यांना उभा नळखांब जलजोडण्या द्वारे पाणी पुरवले जाते. या उंचावरील परिसर जलवितरण परिमंडळाच्या शेवटच्या टोकाला आहे. या वस्त्यांना कैलास नगर, सोनू भोईर, ज्ञानेश्वर नगर येथील स्वतंत्र शोषण टाकी व उदंचन संचाद्वारे पाणी पुरवले जाते. तसेच सोनू भोईर व परीसर येथील विस्तारीत शोषण टाकी व पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच या नवीन विस्तारीत शोषण टाकी आणि पंपिंग स्टेशनची चाचणी सुरु करण्यात आली आहे. या चाचणी काळात या भागात पाणी पुरवठा सुधारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लवकरच ही योजना पूर्ण तत्वावर कार्यान्वीत करण्यात येईल., त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.