water cut : नवी मुंबईमध्ये ‘या’ दिवशी होणार तब्बल १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.

189
Water Cut : मुंबईतील काही भागात १० ते २० टक्के पाणी कपात

एकीकडे राज्यात उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे मान्सून लांबला आहे. अशातच नागरिकांना पाणी कपातीच्या (water cut) संकटाला देखील सामोरं जावं लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांसाठी पाणी कपात जाहीर केली आहे.

(हेही वाचा – Game Jihad :  मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू मुलांचे होतेय धर्मांतर; आरोपी शाहनवाज कुटुंबासह फरार)

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक ०७ जून २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा तब्बल १२ तासांसाठी (water cut) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी १२ तास नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद राहील.

हेही पहा –

तसेच गुरूवार दिनांक ८ जून २०२३ रोजी शहरात सकाळचा पाणी पुरवठा (water cut) कमी दाबाने सुरु होईल. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा नवी मुंबई महानगर पालिका यांच्या कडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.