Game Jihad :  मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू मुलांचे होतेय धर्मांतर; आरोपी शाहनवाज कुटुंबासह फरार

शाहनवाज मकसूद खान हिंदू मुलांना 2015 पासून फरारी इस्लामिक दहशतवादी झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहायला पाठवायचा. जेणेकरून या मुलांचे ब्रेनवॉश व्हायचे.

104

रहिवासी आहे. शाहनवाज मकसूद खान असे त्याचे नाव असून तो शाझिया अपार्टमेंट, मुंब्रा येथे राहतो. मात्र, पोलिस येण्यापूर्वीच तो कुटुंबासह फरार झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक मुंब्रा येथे रवाना झाले आहे.

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन समाजातील एका अल्पवयीन मुलाला इस्लाम स्वीकारण्यासाठी आमिष दाखवण्यात आले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी 30 मे रोजी कविनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या धर्मांतराच्या तावडीत आतापर्यंत तीन हिंदू आणि एका जैन मुलगा सापडला आहे. त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले आहे. यामध्ये धर्मांतराची आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेम जिहाद प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांच्या धर्मांतराचा मोठा आकडा समोर येऊ शकतो. मात्र, या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

गेम जिहादमध्ये हिंदू, जैन तरुणांना फोर्टनाइट नावाच्या व्हिडिओ गेमद्वारे आमिष दाखवण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जाते. आरोपी तरुणांना बड्डो नावाच्या ग्रुपशी ऑनलाइन जोडत असे. शाहनवाज मकसूद खान हा ही ऑनलाइन साइट चालवायचा. या साईटच्या माध्यमातून मुलं शाहनवाजच्या नियमित संपर्कात असायची. काही मुस्लिम तरुणांनी त्यांची नावे हिंदू ठेवून ते जाणीवपूर्वक या साईटवर यायचे आणि खऱ्या हिंदू मुलांना फसवण्यासाठी मदत करायचे. ही मुसलमान मुले हिंदू आणि जैन तरुणांसोबत ऑनलाइन फोर्टनाइट गेम खेळायचे. जर हिंदू किंवा जैन मुले हरली तर त्यांना पुढील गेम जिंकण्यासाठी इस्लामिक धर्मग्रंथातील आयते पाठ करण्यास सांगायचे. त्यातून त्या मुलांचा इस्लामवरील विश्वास वाढायचा.

(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )

दुसऱ्या टप्प्यात, मुलांना इस्लाम स्वीकारण्याचे आमिष दाखवले जायचे. तिसऱ्या टप्प्यात, शाहनवाज मकसूद खान त्या हिंदू मुलांना 2015 पासून फरारी इस्लामिक दहशतवादी झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहायला पाठवायचा. जेणेकरून या मुलांचे ब्रेनवॉश व्हायचे. यानंतर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर तबलीगी जमातच्या तारिक जमीलचा व्हिडिओ त्यांना पाठवण्यात यायचा, जेणेकरून ते हिंदू मुले कट्टरवादी बनत.

एकाला अटक, एक फरार

महाराष्ट्रातील ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शाहनवाज मकसूद खान बद्दो याने एक आयडी तयार केला होती, ज्याद्वारे तो  प्रत्येक जणांना कनेक्ट करत असे. शाहनवाजसोबत अब्दुल रहमान उर्फ नन्नी हा देखील या प्रकरणात आरोपी आहे, जो गाझियाबादच्या संजय नगरचा रहिवासी आहे. हिंदू आणि जैन तरुणांना नन्नी यांनी इस्लामिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी नन्नीला अटक केली आहे, तर शाहनवाज अद्याप फरार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.