Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार, चौघे बेपत्ता

मणिपूर ३ मे २०२३ पासून जातीय हिंसाचाराने हादरले आहे. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के मेईतेई आहेत. तर नागा आणि कुकींसह आदिवासींची संख्या ४० टक्के आहे. हिंसाचारात आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

135
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार, चौघे बेपत्ता

मणिपूरमध्ये बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचाराने (Manipur Violence) डोके वर काढले आहे. या जिल्ह्यांमध्ये डोंगरावर गेलेले चौघे जण बुधवारपासून (१० जानेवारी) बेपत्ता आहेत. दारा सिंग, इबोमचा सिंग, रोमेन सिंग आणि आनंद सिंग अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी केंद्रीय दलांकडून मदत मागवण्यात आली आहे.

अतिरेक्यांकडून गोळीबार आणि बॉम्ब हल्ले – 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार बिष्णुपूर जिल्ह्यातील (Manipur Violence) हाओटक गावात अतिरेक्यांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले. दरम्यान १०० हून अधिक महिला, मुले आणि वृद्ध लोकांना सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास भाग पाडले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले आणि हल्लेखोरांना गोळीबार थांबवण्यास भाग पाडले. अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

(हेही वाचाICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमरा आणि विराट कोहलीची आगेकूच)

… तर राज्यातील सध्याची परिस्थिती टाळता आली असती – मुख्यमंत्री एन बिरेन

मणिपूरचे (Manipur Violence) मुख्यमंत्री एन बिरेन सिंग मंगळवार ९ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात म्हणाले होते की, अंमली पदार्थ आणि अवैध स्थलांतरितांची समस्या नसती तर राज्यातील सध्याची परिस्थिती टाळता आली असती. सरकारने अंमली पदार्थांच्या वापराविरुद्धच्या उपाययोजना आणि राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनधिकृत स्थलांतरितांच्या ओघाविरोधातील मोहीम घटनाबाह्य असल्याचे आढळल्यास मी राजीनामा देईन असे इम्फाल येथे आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले होते. (Manipur Violence)

(हेही वाचा – Passport Ranking: पासपोर्ट क्रमवारीत भारत ८०व्या स्थानी, कोणत्या देशातील नागरिक व्हिसाशिवाय किती देश फिरू शकतात; वाचा सविस्तर)

मणिपूर ३ मे २०२३ पासून जातीय हिंसाचाराने (Manipur Violence)हादरले आहे. बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या एसटी दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला होता. तेव्हापासून हा हिंसाचार सुरू झाला होता. मणिपूरच्या (Manipur Violence) लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के मेईतेई आहेत आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर नागा आणि कुकींसह आदिवासींची संख्या ४० टक्के आहे आणि ते बहुतेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. यामध्ये आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.