BMC : विहारचे वाहून जाणारे पाणी भांडुप संकुलात : प्रकल्प कामांची निविदा अंतिम टप्प्यात

पाऊस, समुद्राची भरती आणि विहार तलावाचे ओसंडून वाहणारे पाणी या तिन्ही घटना एकाचवेळी घडल्यास मुंबईत पुरपरिस्थिती

121
BMC : विहारचे वाहून जाणारे पाणी भांडुप संकुलात : प्रकल्प कामांची निविदा अंतिम टप्प्यात
BMC : विहारचे वाहून जाणारे पाणी भांडुप संकुलात : प्रकल्प कामांची निविदा अंतिम टप्प्यात

सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील विहार तलावातून ओसंडून वाहणारे पाणी, मुसळधार पाऊस आणि समुद्राला असलेली भरती यामुळे मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विहारमधील ओसंडून वाहणारे पाणी भांडुप संकुलात किंवा ऐरोलीच्या खाडीकडे वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुढील काही महिन्यांमध्ये याच्या प्रत्यक्षातील कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे पाणी वळते करण्यासाठी काढलेली निविदा अंतिम टप्प्यात असून सल्लागार कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी कंपनीकडून यावर शिक्कामोर्तब केल्यांनतर कंत्राटदार निवड प्रक्रिया करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – Western Railway : पश्चिम रेल्वेवर गुरुवारी ब्लॉक; लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द)

विहारमधील ओसंडून वाहणारे पाणी भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये, तसेच ऐरोली खाडीकडे वळण्याचा प्रयत्न करण्यासाठी अभ्यास केला जाईल असे तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्यावतीने टाटा कन्सल्टींग इंजिनिअर लिमिटेड कंपनीची सल्लागार म्हणून निवड केली. या सल्लागार सेवेसाठी २ कोटी ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी व विहार तलाव हे मुंबईच्या हद्दीत असून यामधून अनुक्रमे दैनदिन १८ दशलक्ष लिटर व ९० दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यात काही दिवस विहार तलाव ओसंडून वाहत असतो. आणि हे ओसंडून वाहणारे पाणी मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीला जावून मिळते. विहार तलाव हा भांडुप जल शुध्दीकरण संकुलाजवळ असून मिठी नदीचा उगमही हा तलाव ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे होत असे.

परंतु मुसळधार कोसळणारा पाऊस, समुद्राची भरती आणि विहार तलावाचे ओसंडून वाहणारे पाणी या तिन्ही घटना एकाचवेळी घडल्यास मुंबईत पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विहार तलावातील ओसंडून वाहणारे पाणी अन्यत्र वळवल्यास मुंबईतील पुरपरिस्थितीचे प्रमाण काही अंशी कमी होईल. त्यामुळे पावसाळ्यात विहार तलावाचे ओसंडून वाहणारे पाणी भांडुप संकुलातील जलशुध्दीकरण केंद्रात अथवा ऐरोलीतील खाडीकडे वळवून वाहून नेण्याचा विचार तांत्रिक सल्लागार समितीने केला होता.

या तांत्रिक समितीचा अहवाल आणि सल्लागाराच्या अहवालानंतर महापालिकेच्या पाणी प्रकल्प विभागाच्या वतीने निविदा काढून विहारमधील पाणी भांडुप जलशुध्दीकरण केंद्रात वळते करण्यासाठीच्या कामांसाठी कंत्राटदार निवडीची प्रक्रिया राबवली होती. या निविदा स्पर्धेत भाग घेणाऱ्या कंपन्यांनी जी बोली लावली आहे, त्यातील फायनान्सची बिड खुली करून त्यातील सर्व बोलीची रक्कम ही तुलनात्मक योग्य आहे किंवा नाही याचा अहवाल टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या मागवला आहे. हा अहवाल प्रलंबित असून कंत्राटदारांनी आकारलेले हे दर तुलनात्मक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास पुढील निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामुळे लवकरच यासाठीच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करून प्रशासकाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात येत्या काही दिवसांमध्ये कामाला सुरुवात होईल, असा विश्वास महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे दर तुलनात्मक नसल्यास नव्याने निविदा काढली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हे पाणी टनेलद्वारे भांडु संकुलात वळवून मुंबईकरांना शुध्दीकरण करून या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असेही या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.