Versova Illegal Construction : अनधिकृत बांधकामाला संरक्षण; दुय्यम अभियंता निलंबित

5003
Versova Illegal Construction : अनधिकृत बांधकामाला संरक्षण; दुय्यम अभियंता निलंबित

वर्सोवा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका के पश्चिम विभागाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले. कामातील बेजाबदार, निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली झाल्याचे कारण देत त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. (Versova Illegal Construction)

के/प. विभागामध्ये सोमेश शिंदे हे दुय्यम अभियंता (प्रभाग अधिकारी) व प्रभारी सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाना) म्हणून सन २०२२ पासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे प्रभाग क्र.५९,६० व ६३ चा कार्यभार देण्यात आला होता. प्रभाग क्र. ५९ व ६३ या प्रभागातील अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणातील अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे विशेषतः वर्सोवा येथील सागरी किनारा, सीआरझेड व दलदलीच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे आदी बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या. (Versova Illegal Construction)

(हेही वाचा – BJP: संख्याबळ असूनही आम्ही ठरलो लाचार…)

विभागाचे सहायक आयुक्त व सह आयुक्त (परि.-४) यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी व इतर प्राप्त तक्रारी त्यांच्याकडे कारवाई करण्याच्या अनुषंगाने नियमितपणे पाठविण्यात येत होत्या. तसेच आढावा बैठकीमध्ये या बांधकामावर कारवाईसाठी आदेश देऊन कारवाई केली नाही. वर्सोवा स्थित सीआरझेड व सागरी किनारा येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करण्याच्या आवश्यकतेबाबत अतिरिक्त आयुक्त व महापालिका आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन ०३ जून २०२४ रोजी अनधिकृत बांधकामाबाबतची कारवाई हाती घेण्यात आली होती. (Versova Illegal Construction)

ही कारवाई परिणामकारक करण्याकरिता शिंदे यांना मनुष्यबळ व इतर तयारी करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु बाबत वेळावेळी आढावाही घेण्यात आला. परंतु, शिंदे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आली नव्हती. या विभागाचा प्रभाग अधिकारी व प्रभारी सहाय्यक अभियंता (इ.वका.) म्हणून जबाबदारी असूनही याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. परिणामी सहायक आयुक्तांना इतर प्रभागातील इमारत व कारखाने विभागातील अधिकारी त्याचबरोबर परिरक्षण विभागातील अभियंतांसह मनुष्यबळ व इतर तयारी करुन या ठिकाणची कारवाई करुन घ्यावी लागली. (Versova Illegal Construction)

(हेही वाचा – “टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज…” Chitra Wagh यांचा काँग्रेसवर निशाणा)

सोमेश शिंदेंविरोधात ‘या’ होत्या तक्रारी 

३ आणि ४ जून २०२४ रोजी वर्सोवा येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु असताना सह आयुक्त (परि.-४) व इतर अधिकारी दिवसभर उन्हामध्ये उभे असतानाही शिंदे यांनी आपला योग्य सहभाग नोंदवला नाही, उलट या कारवाईच्या वेळेत ते आपल्या खासगी गाडीमध्ये एसी लावून होते. तसेच कारवाई पूर्ण होण्या अगोदरच निघून गेले होते. तसेच दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त यांनी के/पू. विभागामध्ये पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांच्यासह शिंदे यांना वैयक्तिक बोलाविले असतानाही कल्पना असूनही शिंदे त्या बैठकीला जाणून बुजून गैरहजर राहिले. (Versova Illegal Construction)

तसेच अनधिकृत गैरहजेरीच्या, कार्यालयामध्ये येत नसल्याच्या, इतरत्र पंचिंग करत असल्याच्या तसेच विशेषतः बाहेर खासगी कार्यालय थाटल्याच्या अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात प्राप्त झाल्या होत्या. अनधिकृत बांधकाम व अनधिकृत फेरफाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होऊनही या बाबत नोटीसची कारवाई न करणे, सहायक आयुक्त आणि सह आयुक्त (परि. ४) यांच्या पाहणीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात बांधकामे विशेषतः वर्सोवा येथे सुरु असलेले बांधकाम आढळून येणे असे प्रकार दिसून आल्याने शिंदे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येत आहे. शिंदे यांना याबाबत निलंबन पत्र देण्यात आले आहे. त्यात आपल्या बेजाबदार, निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. महापालिका आयुक्तांच्या मंजूरी अन्वये वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामाची खात्यांतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. (Versova Illegal Construction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.