BJP: संख्याबळ असूनही आम्ही ठरलो लाचार…

उबाठा कॉंग्रेस बरोबर गेले इथेच ते संपलं नाही, त्यांच्यासाठी फतवा निघाला आणि विजयाच्या जल्लोषात भगव्या बरोबर पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकले.

619
BJP: संख्याबळ असूनही आम्ही ठरलो लाचार...

>> मंजिरी मराठे

दारुल ए इस्लाम, गझवा-ए-हिंद (bleed them in thousand cuts) या विचारधारेच्या लोकांचं एक बरं आहे. महागाई, पेट्रोलची दरवाढ हे असले प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसतात, त्याबद्दल ते बोलतही नाहीत. कारण त्यांच्यासाठी ‘मोदी को हटाना है’ हा फतवा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. (BJP)

दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांचा अजेंडा तोच होता ‘मोदींचा माज उतरवा’, भले त्यामुळे तुमचे राष्ट्र मरणप्राय होणार असेल तरी चालेल. महाराष्ट्रातील पराभवासाठी भाजपावर झाडून टीका होते आहे; पण त्यांना हरवणारे आपणच आहोत की. मोठ्या किमतीच्या गाड्या उडवणारे आम्ही बोलतो पेट्रोल दरवाढीबद्दल. मोदी काय वाईट बोलतात विरोधकांबद्दल म्हणून गळे काढतो. अजित पवारांना घेतलं म्हणून रडतो. त्यांना बरोबर घेणं ही घोडचूकच होती. राजकारणात कुठलाच पक्ष धुतल्या तांदळासारखा नसतोच. भाजपाही नाही. त्यांच्या अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहेत हे नक्कीच; पण त्यांना धडा शिकवताना आपला हिंदू समाजच गर्तेत ढकलला जात आहे याची आपल्याला जाणच नसावी? गेली सत्तर वर्ष हिंदूंना वाली नव्हता. हिंदुहिताविरुद्ध असंख्य निर्णय घेतले गेले कारण हिंदुत्ववाद्यांकडे सत्ता नव्हती. आता सत्ता आहे पण आमच्यात एकी नाही. आपण इतके सहिष्णू आहोत की, हिंदुहिताचे निर्णय घेतले तरी आपण पर धर्मियांवर अन्याय होऊ देणार नाही. (BJP)

(हेही वाचा –Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, शिवसेना आमदारांच्या पक्षांतराच्या दाव्यावर शिंदेंचा पलटवार )

उबाठा कॉंग्रेस बरोबर गेले इथेच ते संपलं नाही, त्यांच्यासाठी फतवा निघाला आणि विजयाच्या जल्लोषात भगव्या बरोबर पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकले. त्या गटासाठी भगवा फडकं आहे पण आपल्यासाठी आपली शान आहे ना?? शिवाजी महाराजांचा असो की संघाचा असो, भगवा एकच आहे. आम्ही हिंदुंमुळे नाही तर मुस्लीम बांधवांमुळे जिंकलो असं सांगणारे उबाठाचे नेते, मौलवींचे पाय धरणारे त्यांचे नेते जिंकले ते तुमच्या विरोधात त्यांचा उमेदवार नव्हता म्हणून. त्यांनी आता तुम्हाला जिंकवलं असलं तरी तुम्ही त्यांच्यासाठी ‘काफर’च आहात. सत्तेसाठी इतकीss लाचारी? संख्याबळ असूनही एकी नाही म्हणून ही अवस्था आहे.

भाजपा चुकत असला तरीही त्यांना मत द्यायला हवं होतं ते हिंदूहितासाठी. समान नागरी कायदा आला, तर आपल्याला भविष्य आहे. वक्फ बोर्डाला आळा घातला नाही, तर तुम्हाला तुमची जमीनच नसेल ही परिस्थिती येऊ शकते. अयोध्येत बीजेपी हरली म्हणून ओरडणारे आपण आपल्या महाराष्ट्रात का हरली याचं काय उत्तर देणार आहोत?

डावे, समाजवादी, गांधीवादी, अंधभक्त म्हणून खिदळणारे तुम्ही सर्व मोदी विरोधकही, हिंदुस्तानची अनिर्बंध सत्ता हेच ध्येय असलेल्यांसाठी काफरच आहात.. तुमच्यामुळे त्यांची सत्ता येणार असली तरी त्यांच्यासाठी तुम्ही काफरच आहात.. आणि दोष त्यांचा नाही. कारण त्यांचा धर्म, त्यांचा अल्लाच सांगतो काफरांना मारा. तेव्हा सावधान! आता केलेली चूक निदान पुन्हा पाच वर्षांनी करू नका. आपल्याला तारु शकेल तो सावरकरी विचार म्हणजे ‘राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण’. हिंदुत्ववादी शासन असेल तरच तुमचं अस्तित्व आहे, अन्यथा शिरकाणाची निश्चिती आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.