Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनच एक महाकाव्य, माजी खासदार प्रदीप रावत यांचे वक्तव्य

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, शिक्षण विवेक पुणे आणि चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिन सप्ताहानिमित्त आयोजित 'अविश्वसनीय सावरकर' या भव्य चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदीप रावत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्था, पुण्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

82
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनच एक महाकाव्य, माजी खासदार प्रदीप रावत यांचे वक्तव्य
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनच एक महाकाव्य, माजी खासदार प्रदीप रावत यांचे वक्तव्य

सावरकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला, तर असे दिसून येते की, सावरकरांचे (Veer Savarkar) जीवनच एक महाकाव्य आणि महानाट्य होते, असे मत माजी खासदार प्रदीप रावत (Former MP Pradeep Rawat) यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, शिक्षण विवेक पुणे आणि चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिन सप्ताहानिमित्त आयोजित ‘अविश्वसनीय सावरकर’ या भव्य चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदीप रावत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्था, पुण्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी रावत बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुरली लोहाची, अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुधाकर चव्हाण, चित्रकार आणि कलाशिक्षक राजेंद्र महाजन, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर, मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया, जयश्री पाटील, देवेंद्र पाटील उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्रकार योगेंद्र पाटील यांनी साकारलेली ४५ चित्रे मांडण्यात आली आहेत. ‘भगूर ते अंदमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही तैलचित्रे सावरकरांच्या धगधगत्या जीवनावर प्रकाश टाकणारी आहेत.

(हेही वाचा –  Slogan On Education: शैक्षणिक घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? जाणून घ्या…)

वीर सावरकरांचे जीवन प्रेरणादायी
यावेळी बोलताना प्रदीप रावत म्हणाले की, वीर सावरकरांचे जीवन हे प्रेरणादायी असून त्यापासून शेकडो पिढ्या प्रेरणा घेतील, एवढी बीजे त्यांच्या जीवनप्रेरणेत आहेत. चित्रप्रदर्शनाद्वारे चित्रकाराने वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ बाह्यरंग न उलगडता, त्यांचे अंतरंग उलगडले आहे. महापुरुषांचे जीवन हे रोमांचकारी धाडसी आणि त्यागाची परिसीमा गाठलेले असते. त्यामुळे अशा महापुरुषांचे केवळ स्मरण करून नव्हे, तर त्यांची जीवनमूल्ये आत्मसात केली पाहिजे.

वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता…
यावेळी श्रीनिवार कुलकर्णी म्हणाले की, उद्याची सशक्त पिढी घडवण्यासाठी वीर सावरकरांचे विचार विद्यार्थी दशेतच रुजवले गेले पाहिजे. यासाठी चित्र प्रदर्शनासारख्या इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.