Varandh Ghat: कोकणातून पुण्यात जाताय तर थांबा! वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; कधी सुरु होणार?

98
Varandh Ghat: कोकणातून पुण्यात जाताय तर थांबा! वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; कधी सुरु होणार?
Varandh Ghat: कोकणातून पुण्यात जाताय तर थांबा! वरंध घाट वाहतुकीसाठी बंद; कधी सुरु होणार?

रायगड जिल्ह्यातील महाड येथून पुणे (Pune) जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी वरंध घाटाचा (Varandh Ghat) वापर केला जातो मात्र घाटामध्ये पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनापासून सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव अवजड वाहनांसाठी दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाड-भोर पुणे मार्गावरील वरंध घाटात (Varandh Ghat) जागोजागी दरडीचा धोका कायम असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकते.

रस्त्याचा दरीकडील एक भाग कोसळला

हा घाट (Varandh Ghat) अत्यंत धोकादायक झाला असून या मार्गावर वाघजाईजवळ दरी असलेल्या ठिकाणी रस्त्याचा दरीकडील एक भाग कोसळला आहे. वरंध घाटात जागोजागी दरडी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. वरंध घाटाचा १२ किलोमीटरचा काही भाग पुणे जिल्हा हद्दीत येतो. तेथे काही ठिकाणी दरड कोसळणे, माती रस्त्यावर येणे, रस्ता खचणे यासारख्या घटना घडत आहेत. (Varandh Ghat)

संरक्षक भिंतीचा काही भाग खचला

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडला जाणारा महाड-भोर पुणे हा मार्ग गेली काही वर्ष भूस्खलन आणि दरडींमुळे सातत्याने बंद पडत आहे. बुधवारी सकाळी श्री. वाघजाई मंदिराजवळ दरीच्या दिशेने असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग खचला गेला आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी मुसळधार पाऊस नसल्याने या घाटात पर्यटक तुरळक प्रमाणात आहेत. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र, तरी देखील हा घाट मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. (Varandh Ghat)

अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय

परंतु त्यानंतर देखील या घाट रस्त्यावरून वाहतूक सुरू होती मात्र सद्यपरिस्थितीत कोसळणारा पाऊस आणि या रस्त्याची असलेली धोकादायक स्थिती तसेच हवामान खात्याकडून देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा घाट मार्ग २६ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Varandh Ghat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.