Vande Bharat Sleeper Train मधून प्रवास करण्यासाठी अजून वाट पहावी लागणार; काय आहे कारण ?

144
Vande Bharat Sleeper Train interior and exterior views
The new Vande Bharat Sleeper Train showcases modern design.

वंदे भारत ही सेवा लोकप्रिय झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्लीपर वंदे भारतची घोषणा केली आहे. (Vande Bharat Sleeper Train) ही सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होईल, असे अपेक्षित असतांना आता त्यासाठी अधिक विलंब लागणार आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे फर्निशिंग (आतील सजावट) आणि सुरक्षेच्या दृष्टीने दिसून आलेल्या काही त्रुटी, ज्यावर रेल्वे बोर्डाने आक्षेप घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी यापूर्वी ऑक्टोबरमध्ये उद्घाटनाची शक्यता व्यक्त केली होती, परंतु सध्या दुसरा रेक तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आतील कामकाज सुरू आहे.

(हेही वाचा – ICAI CA Result 2025 Live : CA फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचा निकाल कुठे पहाल ?)

रेल्वे बोर्डाने १६ कोचच्या वंदे भारत स्लीपर रेकच्या (Vande Bharat Sleeper Rec) संचालनासाठी तत्त्वतः मंजुरी दिली असली तरी, काही त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाने रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) आणि सर्व रेल्वे विभागांना पाठवलेल्या सविस्तर पत्रात, फर्निशिंगची गुणवत्ता आणि कामगिरीतील उणिवा अधोरेखित केल्या आहेत.

कोणत्या सुधारणा करणार ?
  • बर्थ भागात तीक्ष्ण कोपरे आणि धारदार कडा
  • चुकीच्या रचनेचे खिडकी पडद्यांचे हँडल
  • बर्थ जोडणाऱ्या भागांमध्ये असलेले “पिजन पॉकेट्स”, ज्यामुळे साफसफाई आणि देखभाल अडचणी येतात

रेल्वे बोर्डाने सध्याच्या रेकसाठी तात्काळ सुधारणा करण्याचे आणि आगामी डिझाईनमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायल रनच्या दरम्यान, चीफ कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (CCRS) यांनी RDSO सोबत समान निरीक्षणे नोंदवली होती. त्यानंतर, RDSO ने १ सप्टेंबर २०२५ रोजी आपला अद्ययावत अहवाल सादर केला आहे. (Vande Bharat Sleeper Train)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.