Vande Bharat Express : ओडिशामध्ये ट्रेनवर दगडफेक

100
Vande Bharat Express : ओडिशामध्ये ट्रेनवर दगडफेक

भारताची हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर (Vande Bharat Express) ओडिशात दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. भुवनेश्वर-राउरकेला वंदे भारत ट्रेन (20835) भुवनेश्वर-संबलपूर रेल्वे मार्गावरील ढेंकनाल-अंगुल रेल्वे सेक्शनवर मेरामंडली आणि बुधपंक दरम्यान दगडफेक झाली. या घटनेमुळे ईसी क्लासच्या डब्याच्या खिडकीचे नुकसान झाले. खिडकीच्या काचा फुटल्यात. सुदैवाने या प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही.

यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, दगडफेकीमुळे (Vande Bharat Express) राउरकेला-भुवनेश्वर वंदे भारत ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लास कोचच्या खिडकीच्या काचा फुटल्या. वंदे भारत ट्रेनला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वंदे भारतावरही देशाच्या विविध भागात दगडफेक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेत आतापर्यंत एकही प्रवासी जखमी झालेला नाही. वंदे भारतच्या नुकसानीची माहिती ऑन ड्युटी आरपीएफ एस्कॉर्टिंग कर्मचाऱ्यांनी दिली होती. ईसीओआरच्या सुरक्षा शाखेने या प्रकरणावर गांभीर्य दाखवले असून, आरपीएफ आणि जीआरपीला सतर्क करण्यात आले आहे. ईसीओआरच्या दोन्ही सुरक्षा शाखा स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. यापूर्वी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

(हेही वाचा – MNS: कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; फिनिक्स मॉलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात)

या घटनेनंतर आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त (कटक) यानंतर घटनास्थळी पाठवण्यात आले. भारतीय रेल्वे (Vande Bharat Express) लोकांना ट्रेनवर दगडफेक करू नये म्हणून जनजागृती मोहीम राबवत आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होते. हे अभियान विशेषत: ईस्ट कोस्ट रेल्वेद्वारे चालवले जात आहे. वंदे भारत ट्रेनवर (Vande Bharat Express) दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.