अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स (JD Vance) सोमवार, २१ एप्रिल या दिवशी ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. त्यांचे विमान सकाळी ९:४५ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. जेडी वेन्स पत्नी उषा आणि तीन मुले – इवान, विवेक आणि मिराबेल यांच्यासोबत भारतात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (JD Vance India Visit)
(हेही वाचा – Murshidabad Violence वर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)
कलाकारांनी वेन्स, त्यांची पत्नी आणि मुलांसमोर पारंपरिक नृत्य सादर केले. यानंतर, वेन्स कुटुंब दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात (Akshardham Swaminarayan Mandir) गेले आणि तिथे सुमारे १ तास त्यांनी वेळ व्यतित केला. सायंकाळी ६:३० वाजता वेन्स पंतप्रधानांना (PM Narendra Modi) भेटण्यासाठी ७ लोक कल्याण मार्गावर पोहोचले, जिथे पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. उपराष्ट्रपती झाल्यानंतर जेडी वेन्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे.
जेडी वेन्स यांचा मुलगा इवान यांनी पंतप्रधान मोदींच्या मांडीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी जेडी वेन्स यांच्या तीन मुलांना इवान, विवेक आणि मिराबेल यांना मोरपीस दिले. या भेटीत ही तीनही मुले त्या मोरपिसांसोबत मुक्तपणे खेळत होती. पंतप्रधान मोदी आणि जेडी वेन्स यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स रात्री ९:२० वाजता जयपूरला रवाना झाले. (JD Vance India Visit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community