Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी वाढली! आषाढी सोहळ्यानिमित्त पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर !

Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी वाढली! आषाढी सोहळ्यानिमित्त पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर !

143

उजनी धरणाच्या (Ujani Dam) इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे. उजनी धरणात (Ujani Dam) वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. जवळपास 60 हजार क्युसिक विसर्गने पाणी धरणाकडे येत असल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे. (Ujani Dam)

हेही वाचा-Iran-Israel conflict : “Ali Khamenei यांचे अस्तित्वही उरणार नाही” ; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

आषाढी सोहळ्यात संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याचा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. (Ujani Dam)

हेही वाचा- Ahmedabad Accident : केंद्र सरकार विमान कंपन्यांसोबत नियमित बैठका घेणार ; नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरापु यांची माहिती

संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरण 75 टक्के वर गेल्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असून 75 टक्के एवढी धरणाची पातळी आषाढी यात्रा संपेपर्यंत कायम ठेवण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे आता येईल ते सर्व पाणी पंढरपुरात महापूर येणार नाही याची दक्षता घेत भीमा नदीमध्ये सोडून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (Ujani Dam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.