US Firing : अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; २२ जणांचा मृत्यू

22
US Firing : अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; २२ जणांचा मृत्यू

एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे तर, दुसरीकडे (US Firing) अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. काल म्हणजेच बुधवार २५ ऑक्टोबर रोजी मेनच्या लेव्हिस्टन शहरात काही अज्ञात व्यक्तींकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ६० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शूटरने (US Firing) बुधवारी रात्री हा गोळीबार केला. त्यानंतर अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने संशयिताचे दोन फोटो शेअर केले आहेत.

तसेच ए. बी. सी. न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिंग गल्ली, स्थानिक बार आणि वॉलमार्ट वितरण केंद्रावर गोळीबार (US Firing) झाला.

(हेही वाचा – Ind vs Eng : भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी लखनौमध्ये दाखल )

दोन कायदा अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेसला सांगितले की तपास अधिकारी अजूनही पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत.

पोलिसांनी हल्लेखोराचा (US Firing) फोटो प्रसिद्ध करुन लोकांकडून मदत मागितली आहे. फोटोमध्ये, लांब शर्ट आणि जीन्स घातलेला एक दाढीवाला माणूस रायफल धरून गोळीबार करताना दिसत आहे. लेविस्टन येथील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२०२२ नंतर सर्वात मोठी घटना

गन वायलेन्स आर्काइव्हनुसार, मे २०२२ नंतर अमेरिकेतील ही सर्वात मोठी गोळीबाराची (US Firing) घटना आहे. मे २०२२ मध्ये, टेक्सासमधील उवाल्डे येथील एका शाळेत एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला होता. ज्यात १९ मुले आणि दोन शिक्षक मारले गेले होते. २०२० मध्ये कोविड-19 सुरू झाल्यापासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २०२२ मध्ये अशा ६४७ घटना घडल्या आणि २०२३ मध्ये आतापर्यंत ६७९ घटना घडल्याचे समोर आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.