UPI, Rupay in Mauritius : भारताच्या युपीआय आणि रुपे कार्डांचा मॉरिशस, श्रीलंकेत विस्तार

१२ फेब्रुवारीपासून श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये रुपे कार्ड तसंच युपीआय सुरू होत आहे. 

162
UPI, Rupay in Mauritius : भारताच्या युपीआय आणि रुपे कार्डांचा मॉरिशस, श्रीलंकेत विस्तार
  • ऋजुता लुकतुके

भारताची युनिफाईड पेमेंट्स सर्व्हिस अर्थात युपीआय (UPI) प्रणाली १२ फेब्रुवारीपासून श्रीलंका आणि मॉरिशस या दोन नवीन देशांमध्ये प्रवेश करत आहे. त्याचबरोबर भारताचं रुपे कार्डही या देशात शिरकाव करत आहे. या सेवेचा लाभ भारतातून श्रीलंकेत प्रवास करणारे नागरिक घेऊ शकतील तसंच तिथून भारतात आलेले नागरिकही युपीआय (UPI) वापरू शकतील. तसंच तेच मॉरिशसलाही लागू असेल. तर मॉरिशसमध्ये रुपे कार्ड पोहोचलं आहे. आणि त्यामुळे मॉरिशसच्या बँका रुपेवर आधारित क्रेडिट कार्ड देऊ शकतील. (UPI, Rupay in Mauritius)

‘जागतिक फिनटेक बाजारपेठेत भारताने आपला जोरदार ठसा उमटवला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भारताने आपलं तंत्रज्जान बाहेरच्या देशांमध्ये पोहोचवण्यातही योगदान दिलं आहे. देशांना युपीआय प्रणालीच्या माध्यमातून जोडल्यामुळे भारताचं इतर देशांबरोबर डिजिटल नेटवर्कही उभं राहत आहे,‘ असं केंद्र सरकारकडून (Central Govt) काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (UPI, Rupay in Mauritius)

(हेही वाचा – Ashok Chavan : दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया)

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताने सिंगापूर सरकारबरोबरही फिनटेक क्षेत्रात करार केला होता. आणि त्यामुळे उभय देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करतानाही आता युपीआय (UPI) आणि सिंगापूरची पेनाऊ ही प्रणाली वापरता येते. त्यामुळे भारतातून सिंगापूरला पैसे पाठवताना ते भारतीय खात्यातून रुपयांत वजा होतील. आणि सिंगापूरमधील बँक खात्यात मात्र ते सिंगापूर डॉलरमध्ये जमा होतील. अशा करारांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये भारताचं अमेरिकन डॉलर वरील अवलंबित्व कमी होईल. (UPI, Rupay in Mauritius)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.