Mera Yuva Bharat : ‘मेरा युवा भारत’ च्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

युवा विकास व युवा प्रणित विकास यासाठी तंत्रज्ञानाचे बळ लाभलेली अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वसमावेशक यंत्रणा म्हणून हा मंच काम करेल.

164
Mera Yuva Bharat : 'मेरा युवा भारत' च्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Mera Yuva Bharat : 'मेरा युवा भारत' च्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मेरा युवा भारत (My Bharat) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. युवा विकास व युवा प्रणित विकास यासाठी तंत्रज्ञानाचे बळ लाभलेली अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वसमावेशक यंत्रणा म्हणून हा मंच काम करेल. सरकारच्या दृष्टीकोनातील विकसित भारत उभारण्यासाठी आणि आपल्या आकांक्षा साकार करण्यासाठी युवकांना न्याय्य मंच यामुळे उपलब्ध होईल. (Mera Yuva Bharat)

परिणाम :

मेरा युवा भारत (My Bharat) चे प्राथमिक उद्दिष्ट, युवकांच्या विकासासाठी ‘संपूर्ण सरकार’ मंच तयार करणे, हे आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत संसाधनांची उपलब्धता आणि आणि संधींशी जोडले जाणे यातून युवा समुदाय परिवर्तनाचे दूत आणि राष्ट्र निर्माते बनतील. सरकार आणि नागरिक यांच्यात युवा सेतू म्हणून युवांना काम करता यावे यासाठी हा मंच काम करेल. प्रचंड क्षमतेच्या युवा ऊर्जेचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न हा मंच करेल. (Mera Yuva Bharat)

विस्ताराने :

राष्ट्रीय युवा धोरणातील ‘युवा’ च्या व्याख्येनुसार, मेरा युवा भारत (My Bharat) ही स्वायत्त संस्था १५-२९ वयोगटातील तरुणांसाठी असेल. विशेषत: किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम घटकांच्या बाबतीत, लाभार्थी १०-१९ वर्षे वयोगटातील असतील. (Mera Yuva Bharat)

(हेही वाचा – Ajit Pawar : जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखीव ठेवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)

मेरा युवा भारत (My Bharat) या संस्थेच्या स्थापनेमुळे पुढील गोष्टी घडतील :

a. युवांमध्ये नेतृत्व विकास

i. अनुभवजन्य मर्यादित भौतिक संवादावरून व्यवहारचतुर कौशल्यांकडे वळवून अनुभवात्मक शिक्षणाद्वारे नेतृत्व कौशल्ये सुधारणे.

ii. युवांना सामाजिक नवोन्मेषक, समुदायातील नेते बनवण्यासाठी अधिक गुंतवणूक/लक्ष केंद्रित करणे.

iii. युवाप्रणीत विकासावर सरकारचे लक्ष केंद्रित करणे आणि युवकांना केवळ ”निष्क्रिय प्राप्तकर्ते” न ठेवता विकासाचे “सक्रिय चालक” करणे.

b. युवा आकांक्षा आणि समुदायाच्या गरजा यांच्यात अधिक सलोखा

c. सध्याच्या कार्यक्रमांच्या अभिसरणातून क्षमता वृद्धी

d. युवा आणि मंत्री यांच्यात वन स्टॉप शॉप म्हणून भूमिका बजावेल

e. केंद्रीकृत डेटा आधार निर्मिती

f. युवांना सरकारच्या उपक्रमांशी जोडण्यासाठी आणि युवांशी संबंधित इतर क्रियाकलापांसाठी द्विपक्षी संवाद वाढवणे

g. भौतिक परिसंस्था निर्माण करून पोहोच सुनिश्चित करेल

पार्श्वभूमी:

उच्च वेगाची दूरसंचार उपलब्धता, सोशल मीडिया, नवीन डिजिटल संधी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, अशा वेगाने बदलणाऱ्या जगात ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ या तत्त्वांनुसार युवा पिढीसोबत काम करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने ‘मेरा युवा भारत (My Bharat)’ या एका नवीन स्वायत्त संस्थेच्या रूपात अत्यंत महत्त्वपूर्ण, सर्वसमावेशक सक्षम यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mera Yuva Bharat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.