Underground Garbage Bins : महापालिका रुग्णालय परिसरात भूमिगत कचरापेट्या

शहर भागातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात हे अत्याधुनिक स्वरूपाचे भुमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार असून तब्बल १५ ठिकाणी या कचरा पेट्या बसवण्याचे नियोजन आहे.

795
Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या
Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या
  • सचिन धानजी, मुंबई

महापालिका रुग्णालयात कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे तसेच त्या कचऱ्यापासून दुर्गंधी, रोगराई आणि उंदरांचा सुळसुळाट होऊ नये म्हणून आता या रूग्णालय पासिरात आधुनिक भूमिगत स्वरुपाचे कचऱ्याचे डबे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहर भागातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात हे अत्याधुनिक स्वरूपाचे भुमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार असून तब्बल १५ ठिकाणी या कचरा पेट्या बसवण्याचे नियोजन आहे. (Underground Garbage Bins)

मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले. या सार्वजनिक ठिकाणच्या उघड्यावरील या कचऱ्याची आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच उघड्यावरील या कचरा पेट्यांमधील कचरा मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांमुळे बाहेर फेकला जातो. त्यामुळे कचरा पेटीचा परिसर अस्वच्छ होऊन त्याठिकाणांहून चालतांना पादचाऱ्यांना तसेच नागरिकांना नाकाला रुमाल लावून चालावे लागते. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीच्या भूमिगत कचरा पेट्या बसवल्यास कचऱ्याची दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल या विचाराने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या चार विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते डबे बसवण्यातही आले आहेत. (Underground Garbage Bins)

(हेही वाचा – Shatabdi Express : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान; प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक)

त्यामुळे आता रूग्णालय परिसर सुंदर व स्वच्छ रहावा यासाठी महानगरपालिकेच्या शहर विभागातील रुग्णालयांत १५ भूमिगत स्वरुपाचे कचरा डबे बसवण्याचा निर्णय घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला असल्याची माहिती मिळात आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात इतर कचऱ्यासोबत जैविक कचराही मोठ्या प्रमाणात जमा होत असतो. या जैविक कचऱ्याची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत असली तरीही प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेला हा जैविक कचरा बऱ्याचदा उंदीर, घुशी किंवा भटके कुत्रे हे या जैविक कचऱ्याच्या पिशव्या फाडून त्यातील कचरा अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न करतात. शिवाय इतरही कचरा हा पेट्यांच्या बाहेर पडलेला असतो. त्यामुळे हे चित्र दिसायला खराब दिसते आणि त्यामुळेच रुग्णालयात या पेट्या बसवणं आवश्यक असल्याने तसेच याबाबत होणारी मागणी लक्षात घेता या भूमिगत कचरा पेट्या शहरातील रुग्णालय परिसरात सर्वप्रथम बसवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर ज्या कचरा पेट्या बसवल्या होत्या, त्याच्या यशस्वी प्रयोग झाल्यानंतर मुंबईतील अनेक विभाग कार्यालयांच्या हद्दीत अशा प्रकारच्या भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात आलेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Underground Garbage Bins)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.