नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमधून (Umred) एक आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला आहे. उमरेड येथील कोसे लेआऊट परिसरात शनिवारी भल्या पहाटे 4 वाजता 50 किलो धातुचा मोठा तुकडा एका घराच्या छतावर कोसळला. आकाशातून हा तुकडा या घराच्या गच्चीवर पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील अनेक जण घाबरून घराबाहेर आले. (Umred)
स्थानिक अमेय बसेशंकर यांच्या घरावर हा धातुचा तुकडा आपटला. त्यामुळे भिंतीचा काही भाग तुटला. या घटनेनंतर हा तुकडा कशाचा याची चर्चा रंगली आहे. हा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. या तुकड्याचा आता तपास होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Umred)
दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा धातुचा तुकडा कशाचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या तुकड्याची पाहणी केली. त्यानंतर हा तुकडा आता पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे. हा धातुचा तुकडा 50 किलो वजनाचा आहे. या तुकड्याची जाडी 10 ते 12 मिलीमीटर तर तो 4 फूट लांब आहे. याप्रकरणी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हा तुकडा कशाचा आहे आणि हा तुकडा नेमका कशाचा याचा आता तपास करण्यात येत आहे. (Umred)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community