UlhasNagar Crime : पहा कसा झाला महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक केली आहे.

625
Ganpat Gaikwad Firing : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करते; गणपत गायकवाडांचा न्यायालयात आरोप; ११ दिवसांची पोलीस कोठडी

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) कल्याण पूर्व (UlhasNagar Crime) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील गंभीर जखमी झाले. महेश गायकवाड यांना लागलेल्या गोळ्या काढण्यात आल्या असून अधिक उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – UlhasNagar Crime : शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक)

आमदार गणपत गायकवाड (UlhasNagar Crime) यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि इतर दोन जण फरार आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – UlhasNagar Crime : आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार)

अशातच आता या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक – 

उल्हासनगर गोळीबारातील (UlhasNagar Crime) जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. श्रीकांत शिंदे भेटल्या नंतर महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली . महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. महेश गायकवाड यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. सहा गोळ्या शरीरातून बाहेर काढल्या परंतु जखम गंभीर आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.