UlhasNagar Crime : आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार

पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकाच्या केबिन मध्ये गोळीबार. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.

279
UlhasNagar Crime : आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. (UlhasNagar Crime)

(हेही वाचा – George Adamson : ‘बॉर्न फ्री’ नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन)

नेमकं प्रकरण काय ?

उल्हासनगरमधील हिल लाईन (UlhasNagar Crime) पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. महेश गायकवाड आणि त्यांच्या एका समर्थकाला पाच गोळ्या लागल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना सांगितले. शुक्रवारी हिल लाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात चर्चा सुरू असताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी हाणामारी करून महेश यांच्यावर गोळीबार केला.

(हेही वाचा – Government Internships : गव्हर्नमेंट इंटर्नशिप करण्याचे ५ मुख्य फायदे कोणते आहेत?)

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात मतभेद –

या घटनेत शिवसेना नेते महेश गायकवाड (UlhasNagar Crime) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टीवरून मतभेद झाले, ते तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांच्यात बोलणे झाले आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या लोकांवर गोळीबार केला. यात दोन जण जखमी झाले आहेत. तपास सुरू आहे, असे डीसीपी सुधाकर पठारे यांनी सांगितले. (UlhasNagar Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.