UBT Shivsena Dasara Melava : मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा घ्या; आमची तयारी आहे – उद्धव ठाकरे यांचे आव्हान

मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही घ्या, असे आव्हान उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते.

177
UBT Shivsena Dasara Melava : मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा घ्या; आमची तयारी आहे - उद्धव ठाकरे यांचे आव्हान
UBT Shivsena Dasara Melava : मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा घ्या; आमची तयारी आहे - उद्धव ठाकरे यांचे आव्हान

आमदार अपात्रतेच्या याचिकेवर तारखेवर तारीख असे चालू आहे. (UBT Shivsena Dasara Melava) सर्वोच्च न्यायालय यांचे पुन्हा पुन्हा कानफाट फोडते. तरीही निर्लज्ज होऊन हे पुन्हा पुन्हा तेच सांगतात.  वेळापत्रक सादर करतो म्हणतात. सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च संस्था आहे. त्या ठिकाणी अशी उत्तरे दिली जात असतील तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे कि नाही ? आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचे अस्तित्व राहणार कि नाही ? लोकशाही टिकणार कि नाही ? केसचा निकाल लागण्याच्या आत निवडणुका घेऊन टाका. आमची तयारी आहे. मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही घ्या, असे आव्हान उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते. (UBT Shivsena Dasara Melava)

(हेही वाचा – Li Shangfu : चीनच्या संरक्षणमंत्र्यांची ४ महिन्यांत कोणतेही कारण न देता पदावरून हकालपट्टी)

या वेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ”जनतेच्या न्यायालयात तारीख पे तारीख नसते. एका घावात घरी बसवतील. यांनी घाबरून विद्यापिठाच्या निवडणुकाही पुढे नेल्या आहेत.” भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मी आज गद्दारांवर बोलणार नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले; परंतु टीका केलीच ! शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना टोमणे मारतांना ठाकरे म्हणाले, ”दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. शिवभक्त असूनही रामाला रावणाचा वध करावा लागला. रावण माजला होता. त्याने सीतेला पळवून नेले होते. आज रावणाने धनुष्यबाण ही चोरला आहे. त्या खोकासुरांचे दहन आपल्याला करायचे आहे. खोक्याची लंका दहन करणाऱ्या मशाली आजही माझ्याकडे आहेत.” (UBT Shivsena Dasara Melava)

दसरा मेळाव्यात यंदा काय नवीन ऐकायला मिळणार अशी उत्सुकता सर्वांना होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी यंदाही मुंबईतील उद्योग-धंदे गुजरातला नेले, आरे मेट्रो शेड, कोविड काळात केलेले कार्य हे तेच तेच मुद्दे मांडले. (UBT Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.