UBT Shivsena Dasara Melava : राज्यात आणि दिल्लीत ठाकरेंचेच सरकार; शिवतीर्थावरून संजय राऊतांचा ‘इंडी’ आघाडीला सूचक इशारा

ड्युपलिकेट चायनीज माल येतो आणि जातो. हा जो समोर दिसतोय तो मराठा तितुका मेळवावा; तिकडे दिसतोय तो मराठा तितुका लोळवावा. मागच्या मेळाव्याला माझी खुर्ची रिकामी होती. मी १०० दिवस तुरुंगात होतो. पण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक मोडला नाही, नमला नाही, माघार घेतली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

101
UBT Shivsena Dasara Melava : राज्यात आणि दिल्लीत ठाकरेंचेच सरकार; शिवतीर्थावरून संजय राऊतांचा 'इंडी' आघाडीला सूचक इशारा
UBT Shivsena Dasara Melava : राज्यात आणि दिल्लीत ठाकरेंचेच सरकार; शिवतीर्थावरून संजय राऊतांचा 'इंडी' आघाडीला सूचक इशारा

पंतप्रधान मोदींविरोधात एकवटलेले ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्ष एकीकडे या आघाडीची कमान स्वतःच्या हाती घेण्यासाठी ना-ना तऱ्हेचे प्रयत्न करीत असताना, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘अबकी बार ठाकरे सरकार… महाराष्ट्रात आणि दिल्लीतसुद्धा’, असा नारा दिला आहे. (UBT Shivsena Dasara Melava) उद्धव ठाकरेंच्या समक्ष थेट शिवतीर्थावरून राऊत यांनी ‘इंडी’ आघाडीला सूचक संदेश दिल्यामुळे येत्या काळात काँग्रेससह, नितीश कुमार, ममता आणि अन्य नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (UBT Shivsena Dasara Melava)

(हेही वाचा – UBT Shivsena Dasara Melava : मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा घ्या; आमची तयारी आहे – उद्धव ठाकरे यांचे आव्हान)

उबाठा गटाच्या वतीने मंगळवारी २४ ऑक्टोबरला दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी उपरोक्त विधान केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. राऊत म्हणाले, ड्युपलिकेट चायनीज माल येतो आणि जातो. हा जो समोर दिसतोय तो मराठा तितुका मेळवावा; तिकडे दिसतोय तो मराठा तितुका लोळवावा. मागच्या मेळाव्याला माझी खुर्ची रिकामी होती. मी १०० दिवस तुरुंगात होतो. पण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक मोडला नाही, नमला नाही, माघार घेतली नाही. आम्ही पळणाऱ्यांतले नाहीत. ज्यांचा जळून कोळसा झाला ते पळाले. (UBT Shivsena Dasara Melava)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज सांगतात, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पण मागच्या दाराने सगळ्यांना पकडून पकडून ते भाजपमध्ये घेत आहेत आणि मंत्री बनवित आहेत. हसन मुश्रीफ यांनी नुकतेच एक विधान केले. भाजपावाले मला तुरुंगात टाकायला निघाले होते, पण मी भाजपासोबत गेलो आणि माझी ईडीची फाईल बंद झाली. त्यामुळे भाजपाच्या या दुतोंडीपणाचे मला आश्चर्य वाटते. अमित शहा दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये गेले होते. तेथे यांनी सांगितले, जर इकडे भाजपाची सत्ता आली, तर घोटाळेबाजांना उलटे लटकवू. मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्प्या का घेता? हिम्मत असेल तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवायची सुरुवात महाराष्ट्रापासून करा, असे आव्हान राऊत यांनी दिले. (UBT Shivsena Dasara Melava)

एकनाथ शिंदे हाच मोठा घोटाळा !

– काही महिन्यांपूर्वी भोपाळमध्ये नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. अशा भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला होता, पण पुढच्या चार दिवसांत अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. आमच्याकडचे ४० आमदार कोट्यवधींचे खोके घेऊन बाहेर पडले. तुमच्यात हिम्मत असेल तर आधी त्या ४० आमदारांना उलटे लटकवा.

– एकनाथ शिंदे हाच मोठा घोटाळा आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्या दारावर ईडीच्या नोटीसा लावल्या. राहुल कूलविरोधात मी स्वतः पुरावे दिले. दादा भुसे यांनी १७८ कोटींची शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याला उलटे लटकवायचे सोडून अमित शहांनी मंत्री केले. उदय सामंत याने १०० कोटींचा डांबर घोटाळा केला. हा यांचा उद्योगमंत्री. अशाप्रकारे ही मंडळी महाराष्ट्र लुटण्याचे काम करीत आहेत. (UBT Shivsena Dasara Melava)

– अमित शहा, या भ्रष्टाचाऱ्यांना फाशी देण्यासाठी तुमच्याकडे दोर नसतील, तर आम्ही देऊ. जल्लाद नसेल तर तोही आम्ही देऊ. पण या ४० गद्दार आमदारांना तुम्ही उलटे लटकवले नाहीत, तर ही महाराष्ट्राची जनताच तुम्हाला आता उलटे लटकवेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. (UBT Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.