Trinamool Congress च्या खासदाराला Delhi High Court ने ठोठावला ५० लाख रुपयांचा दंड

Delhi High Court : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई, इंग्रजी वर्तमानपत्रात आणि ट्विटरवर 'माफीनामा' प्रसारित करण्याचा आदेश Delhi High Court ने कडून साकेत गोखले यांना दिला आहे.

110
Trinamool Congress च्या खासदाराला Delhi High Court ने ठोठावला ५० लाख रुपयांचा दंड
Trinamool Congress च्या खासदाराला Delhi High Court ने ठोठावला ५० लाख रुपयांचा दंड

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या पत्नी व संयुक्त राष्ट्रांच्या माजी साहाय्यक सरचिटणीस लक्ष्मी पुरी यांना 50 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) तृणमूलचे खासदार साकेत गोखले (Saket Gokhale) यांना दिले आहेत. न्यायालयाने गोखले यांना टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर माफीनामा प्रकाशित करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशांचे पालन करण्यासाठी 8 आठवड्यांची मुदत दिली आहे. यापुढे खालील विषयावर पुन्हा कोणती वाच्यता करण्यावरही कोर्टाने बंदी टाकली आहे.

(हेही वाचा – Bharatiya Nyaya Sanhita : यापुढे धर्म लपवून विवाह करणे सोपे नाही; नव्या कायद्यानुसार होणार शिक्षा)

गोखले यांनी केला खोटा आरोप

लक्ष्मी पुरी (Lakshmi Puri) यांनी तृणमूलचे (Trinamool Congress) खासदार साकेत गोखले यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. लक्ष्मी पुरी यांनी याचिकेत आरोप केला होता की, गोखले यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खोटे आणि तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आहेत. याचिकेत लक्ष्मी पुरी यांनी म्हटले आहे की, 13 आणि 23 जून 2021 रोजी साकेत गोखले यांनी आपल्यावर आणि पती हरदीप सिंग पुरी यांच्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केले होते की, या जोडप्याने 2006 मध्ये जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे काळ्या पैशाने घर खरेदी केले होते.

यापूर्वी न्यायालयाने साकेत गोखले यांना लक्ष्मी पुरी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व पोस्ट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्याच्या विरोधात प्रतिवादीने केलेल्या अनेक पोस्टचा भाग असलेल्या संबंधित पोस्ट देखील हटवा.

6 महिन्यांसाठी माफी डिलीट करू नये

न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने सोमवारी निकाल देताना सांगितले की, साकेत गोखले यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांमुळे लक्ष्मी पुरी यांना त्रास सहन करावा लागला आहे आणि फिर्यादीची माफी मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ती माफी एक्स खात्यावर आणि वर्तमानपत्रात प्रकाशित करावी. याव्यतिरिक्त गोखले एक्स खात्यावर प्रकाशित केलेले ट्विट 6 महिन्यांपर्यंत हटवले जाणार नाहीत. त्याच वेळी न्यायालयाने म्हटले की, प्रतिष्ठेच्या हानीची भरपाई कोणतीही रक्कम करू शकत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.