-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी महापालिकेच्या दोन महिलांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील दोन उद्यान विद्या सहायकांनी चक्क झाडांना (Tree) वेदनांमधून मुक्त केले. बोरीवलीतील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५० हून अधिक वृक्षांना ठोकलेले खिळे काढून या उद्यान विद्या सहायकांनी या वृक्षांना कायमच्याच वेदनांमधून मुक्त केले असून या दिवसापासून हाती घेतलेली ही मोहिम पुढेही सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Metro च्या फेऱ्या रद्द; शेकडो प्रवाशांचे हाल)
मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्यावतीने महिला दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिला दिनानिमित्त महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील पुनम पास्टे, सुप्रिया सावंत या दोन्ही उद्यान विद्या सहायकांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. यासाठी या महिला अधिकाऱ्यांनी बोरीवली पश्चिम येथील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५० हून अधिक झाडांना (Tree) ठोकलेले खिळे स्वत: पुढाकार घेऊन काढले. त्यांनी तब्बल १५० ते २०० खिळे काढले आहेत.
(हेही वाचा – Syria मध्ये पुन्हा हिंसाचार; एक हजारांपेक्षा जास्त नागरिक ठार)
या रस्त्यावरील झाडांसह (Tree) इतर झाडांना फलक तथा बोर्ड लावले जातात. यासाठी खिळे मारले जातात तसेच तारा बांधण्यासाठीही खिळे ठोकले जातात. परंतु हे बोर्ड किंवा तारा काढताना खिळे मात्र तसेच ठेवले जातात. परिणामी हे खिळे गंजून झाडांना धोका पोहोचतो. त्यामुळे हे खिळे काढणे खूप आवश्यक असतात. या खिळ्यांमुळे एकप्रकारे वृक्षांना यातना होत असतात आणि हेच खिळे काढून एकप्रकारे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी या वृक्षांना वेदनांतून मुक्ती दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community