Traffic Closed : समृद्धी महामार्गावरील वाहतूक तीन दिवस दुपारी बंद राहणार, ‘हे’ आहे कारण…

बंद कालावधीत पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.

48
Traffic Closed : समृद्धी महामार्गावरील वाहतूक तीन दिवस दुपारी बंद राहणार, 'हे' आहे कारण...
Traffic Closed : समृद्धी महामार्गावरील वाहतूक तीन दिवस दुपारी बंद राहणार, 'हे' आहे कारण...

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे  ( Traffic Closed) काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवार ( ३१ ऑक्टोबर) ते गुरुवारपर्यंत (२ नोव्हेंबर) असे तीनही दिवस दुपारी बारा ते साडेतीन या वेळात बंद असणार आहे. उर्वरित कालावधीत वाहतूक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तीनही दिवस काम सुरू असलेल्या कालावधीत (दुपारी १२ ते साडेतीन) जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी-१४) ते सावंगी इंटरचेंज (आयसी -१६) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज आयसी १४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ – अे (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रिज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपासमार्गे सावंगी इंटरचेंज क्रमांक आयसी -१६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल.

(हेही वाचा – Ravindra Chavan : २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा; रवींद्र चव्हाण यांचे निर्देश )

समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी -१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरून (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी -१४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल. उर्वरीत कालावधीत वाहतूक सुरळीत सुरू राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.