Tiger Baby Birthday: राणीच्या बागेत ‘जय’ आणि ‘रुद्र’चा वाढदिवस साजरा

गेल्यावर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शक्ती आणि करिश्मा या जोडीने २ बछड्यांना जन्म दिला होता

55
Tiger Baby Birthday: राणीच्या बागेत 'जय' आणि 'रुद्र'चा वाढदिवस साजरा
Tiger Baby Birthday: राणीच्या बागेत 'जय' आणि 'रुद्र'चा वाढदिवस साजरा

मुंबईला भेट देणाऱ्या देशविदेशातील (Tiger Baby Birthday) पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी वाघाच्या २ बछड्यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

‘जय’ आणि ‘रुद्र’ अशी या दोन बछड्यांची नावं आहेत. यापूर्वी परदेशातून आणलेल्या पेंग्विनचाही वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हे बछडे एक वर्षाचे झाले आहेत. राणीच्या बागेत पहिला, पाचवा आणि दहावा असे वाढदिवस साजरे करण्यात येतात.

(हेही वाचा – Piracy : चित्रपट उद्योगाला ‘पायरसी’चे ग्रहण; वर्षाला होतेय ‘इतक्या’ कोटींचे नुकसान)

गेल्यावर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शक्ती आणि करिश्मा या जोडीने २ बछड्यांना जन्म दिला होता. त्यांची नावे जय आणि रुद्र अशी ठेवण्यात आली. या दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस राणीच्या बागेत साजरा करण्यात आला. सुरुवातीचे दीड ते दोन वर्षे हे बछडे आईसोबतच राहतात, अशी माहिती त्यांच्याविषयी जीवशास्त्रज्ञ आणि जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.