Skill development साठी तीन सामंजस्य करार; राज्यातील २० आय.टी.आय.मध्ये उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा

72
Skill development साठी तीन सामंजस्य करार; राज्यातील २० आय.टी.आय.मध्ये उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा
Skill development साठी तीन सामंजस्य करार; राज्यातील २० आय.टी.आय.मध्ये उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा
मुंबई प्रतिनिधी:

Skill development : राज्यातील २० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (I.T.I.) मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच सूक्ष्म-लघु उद्योजकांसाठी प्रशिक्षण, उद्योजक मेळावे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे तांत्रिक शिक्षण व रोजगार संधी वाढवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हे करार संपन्न झाले. (Skill development)

(हेही वाचा – Sand Art : कला सादर करण्यास पैसे नव्हते, मग समुद्र किनार्‍यालाच केले कॅनव्हास; ‘हा’ आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करणार अद्भुत वाळू कलाकार)

पहिल्या त्रिपक्षीय करारात श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांचा समावेश आहे. याअंतर्गत २० आय.टी.आयमध्ये इलेक्ट्रिशियन कार्यशाळांचा दर्जा सुधारला जाईल. तसेच सोलार टेक्निशियन आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारल्या जातील. स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनमार्फत वीजतंत्री विद्यार्थ्यांना बेंगलोर येथे १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. पुढील चार वर्षांत ९,७५० विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन, अक्षय ऊर्जा आणि ऑटोमेशन क्षेत्रातील प्रशिक्षणाचा लाभ होईल. पहिल्या वर्षात १,५०० दुसऱ्या वर्षात २,२५० तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात प्रत्येकी ३,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळेल.

दुसऱ्या करारात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि पुण्यातील देआसरा फाउंडेशन (Deasara Foundation) यांनी उद्योजकता वाढवण्यासाठी हातमिळवणी केली. यात ५,००० सूक्ष्म-लघु उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि मेळाव्यांद्वारे व्यवसाय व्यवस्थापन, विपणन आणि आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जातील.

तिसऱ्या करारात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि प्रोजेक्ट मुंबई (Project Mumbai) यांनी आय.टी.आयमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण, सांकेतिक भाषेतील अभ्यासक्रम आणि ऑन-द-जॉब प्रशिक्षणासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यातील कौशल्य विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.