Radhakrishna Vikhe Patil : गोसेवा आयोगाचे काम गतिमान होणार

राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच आयोगाला आवश्यक असलेल्या एकूण १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

147
Radhakrishna Vikhe Patil : महसूल विभागातील ब्रिटिशकालीन पदांची नावे बदलून सन्मानाची नावे देण्यात यावी

राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा (Goseva Commission) कारभार गतिमान करण्यासाठी शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच आयोगाला आवश्यक असलेल्या एकूण १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचे प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते. (Radhakrishna Vikhe Patil)

पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात प्रथमच महाराष्ट्र गोसेवा आयोगाची (Goseva Commission) स्थापना करण्यात आली. या आयोगाची कार्य पद्धती निश्चित करून गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता आयोगासाठी एकूण १६ पैकी ८ नियमित पदे व ८ पदे बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त करण्यासाठी तब्बल १ कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याची माहिती विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. (Radhakrishna Vikhe Patil)

(हेही वाचा – Farmer Accident Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी ४८.६३ कोटी रुपये वितरित)

८ जणांची नियुक्ती केली जाणार 

महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी (Goseva Commission) पशुसंवर्धन उपायुक्त, स्वीय सहाय्यक, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी (गट ब), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक असे प्रत्येकी एक आणि दोन पशुधन विकास अधिकारी (गट अ) असे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तर बाह्यस्त्रोताद्वारे एक कनिष्ठ लिपिक, एक स्वच्छक, दोन डेटा एंट्री ऑपरेटर, दोन परिचर, दोन सुरक्षा रक्षक असे एकूण ८ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र गोसेवा आयोगामुळे (Goseva Commission) अतिशय गतिमान पद्धतीने काम करता येईल, अशी माहिती विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. (Radhakrishna Vikhe Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.